26 September 2020

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

१. ‘शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत घोषणाबाजी
अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परतल्याने आमदारांमध्ये उत्साहाचं वातावरण असून शपथविधीसाठी सभागृहात जाण्याआधी घोषणाबाजी करण्यात आली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ‘शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राष्ट्रवादी जिंदाबाद’ अशा घोषणा अजित पवारांच्या उपस्थितीत देण्यात आल्या. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासहित राष्ट्रवादीचे इतर आमदारही उपस्थित होते. वाचा सविस्तर : 

२. बगदादी विरोधातील मोहिमेतील ‘कॉनन’ श्वानाचा गौरव
आयसिसचा प्रमुख अबु बक्र अल बगदादी याला ठार मारण्याच्या अमेरिकी कमांडोजच्या मोहिमेत मोठी भूमिका पार पाडणाऱ्या कॉनन या श्वानाचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सन्मान केला आहे. या मोहिमेत कॉनन हाच खरा नायक ठरला आहे कारण त्याने बगदादीचा त्याच्या लपण्याच्या जागी जाऊन पाठलाग करीत तो तेथे असल्याची खात्री अमेरिकी कमांडोजना करून दिली होती. वाचा सविस्तर : 


३. २६/११ हल्ल्यातील दोषींवर कारवाईची अमेरिकेची मागणी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे मत अमेरिकेने व्यक्त केले आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे सहा नागरिकही ठार झाले होते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांचे आम्ही स्मरण करतो आणि या हल्ल्यास जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शासन करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॉर्गन ओर्टागस यांनी ट्वीट केले आहे. वाचा सविस्तर :

४. शपथविधी सोहळ्यापूर्वी आदित्य ठाकरे आवर्जून ‘या’ ठिकाणी गेले
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अखेर मंगळवारी घडलेल्या नाट्यमय राजकीय घडमोडीनंतर सुटला. याचबरोबर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर आज (बुधवार) सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे त्यांना आमदारकीची शपथ देत आहेत. या शपथविधी सोहळ्याला जाण्याअगोदर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन सकाळी ८ वाजता दर्शन घेतले. वाचा सविस्तर : 

५.“मेकअप करुन वय लपणार नाही”; नेटकऱ्यांनी केलं मलायकाला ट्रोल
बॉलिवूडमधील सेलिब्रिटी असो किंवा क्रिकेटपटू कधी कोण ट्रोलर्सच्या निशाण्यावर येईल हे काही सांगता येत नाही. यामध्येच अनेक वेळा बॉलिवूड अभिनेत्रींना ट्रोलिंगचं शिकार व्हावं लागतं. काही दिवसांपूर्वीच मलायकाला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल करण्यात आलं होतं. तिने परिधान केलेल्या ड्रेसची चर्चा थांबत नाही तोच पुन्हा एकदा तिला ट्रोल व्हावं लागलं. यावेळी मात्र तिने केलेल्या मेकअपमुळे तिला ट्रोल व्हालं लागलं आहे. वाचा सविस्तर :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 9:47 am

Web Title: top five morning news bulletin mumbai terrirest attack crime america ssj 93
Next Stories
1 मोदी लाट ओसरली, दीड वर्षात ‘ही’ राज्ये झाली भाजपामुक्त
2 विरोधकांचे बळ वाढले!
3 दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सरपंच, अधिकारी ठार
Just Now!
X