१. गुजरातमध्ये परप्रांतीय हटाओ मोहिमेत काँग्रेसचा हात!
गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परप्रांतीय हटाओ मोहिमेमागे काँग्रेस पक्षाचा हात असून त्यांचे मनसुबे उधळून लावण्यात सरकारला यश आले आहे. राज्य सोडून जाणारे परप्रांतीय पुन्हा राज्यात परतत असल्याचा दावा गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी शनिवारी येथे केला. वाचा सविस्तर : 

२. रविवार विशेष : तू नव्या युगाची आशा..

जीर्ण झालेली पाने गळून पडल्यानंतर झाडाला चैत्र महिन्यात नवी पालवी फुटू लागते. क्रीडाक्षेत्रालाही हा निसर्गनियम लागू होतो. सध्या भारताच्या क्रीडाक्षेत्रातही चैत्रपालवी फुटली आहे. ताज्या दमाच्या नव्या खेळाडूंमुळे भारताच्या क्रीडाक्षेत्रातही अपेक्षांचे वारे वाहू लागले आहेत. हिमा दास, मनू भाकर, नीरज चोप्रा, पृथ्वी शॉ, सौरभ चौधरी यांसारख्या युवा खेळाडूंचा बोलबाला सध्या सुरू झाला आहे. कठीण परिस्थितीतून खडतर संघर्ष करत पुढे येत या खेळाडूंनी नव्या युगाची आशा दाखवून दिली आहे. हे खेळाडू कसे घडले? गरीब कुटुंबात जन्म घेऊनही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप कशी घेतली? त्यांची ही संघर्षगाथा.. वाचा सविस्तर :

३. वैद्यकीय शिक्षण संचालनालयही वाळवीने पोखरले!
राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालनालय म्हणजे उंदीर व घुशींचे हक्काचे निवासस्थान बनले आहे.. छताचे प्लास्टर कधी डोक्यावर पडेल ते सांगता येत नाही. कोणत्या कपाटातील फाईलला वाळवीचा विळखा असेल हे सांगणे कठीण आहे. काही वेळा आम्हाला वाळवीने भरलेली फाईल कपाटातून काढून संचालनालयाच्या खाली नेऊन रॉकेलने जाळावी लागते.., हे अस्वस्थ करणारे उद्गार आहेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांचे. वाचा सविस्तर : 

४ .‘हे तर धक्कादायक’
बॉलीवूडमध्ये ‘# मी टू’ मोहिमेंतर्गत रोज नवीन नाव, नवीन गोष्ट समोर येते आहे. ही नावंही बॉलीवूडमध्ये आजवर नावलौकिक कमावलेल्यांची असल्याने याप्रकरणी कोणतेच मोठे कलाकार सहजी बोलायला फारसे तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर आपल्या आगामी ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीनिमित्ताने समोर आलेल्या अर्जुन कपूरने मात्र या प्रकरणाचा आणि त्यावर बॉलीवूडमधील त्याच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेचा स्पष्ट शब्दांत निषेध व्यक्त केला. वाचा सविस्तर : 

५. डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याचा उल्लेख
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव तथा बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या मृत्यू दाखल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण मुंबईत झाल्याचा उल्लेख असल्याने त्यात दुरुस्ती करण्याची विनंती केल्यानंतर मुंबई महापालिकेने त्याबाबतचे पुरावे मागितले आहेत. वाचा सविस्तर :