31 October 2020

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

टॉप ५

१. आंध्र, ओडिशाला ‘तितली’ची धडक; शाळा-कॉलेज बंद, ३ लाख नागरिकांना हलवले

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या शक्तिशाली ‘तितली’ चक्रीवादळाने उग्र रूप धारण केलं असून ओडिशाच्या तटवर्तीय परिसरात हे वादळ धडकलं आहे. मंगळवारपासून अत्यंत तीव्र झालेले हे चक्रीवादळ केव्हाही ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या सागरतटाला धडक देईल अशी शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवली होती. ‘तितली’ चक्रीवादळ आज सकाळी साडेपाच ते साडेअकरा दरम्यान केव्हाही गोपाळपूरला पोहोचण्याची शक्यता होती, त्यानुसार सकाळी सव्वा सहाच्या सुमारास हे वादळ येथे धडकलं. वाचा सविस्तर :

 

२. जागतिक कीर्तीचे व्हायोलीन वादक पं. डी. के दातार यांचे निधन
जागतिक कीर्तीचे व्हायोलीनवादक पंडित डी. के. दातार यांचे बुधवारी रात्री अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि डॉ. निखिल व डॉ. शेखर ही मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गायकी अंगाने व्हायोलीन वादन करणारे एक अतिशय वरच्या दर्जाचे कलावंत म्हणून ते प्रसिद्ध होते. वाचा सविस्तर :

३. #MeToo : नाना पाटेकरांसह चार जणांवर गुन्हा दाखल
अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तिने एका मुलाखतीत केला. यानंतर बुधवारी रात्री तनुश्री दत्ताने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. तनुश्रीने तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर :

४. कोहली, धोनीच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह
महेंद्रसिंग धोनीचा खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहलीच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड गुरुवारी केली जाणार असून महेंद्रसिंग धोनीच्या जागी आक्रमक खेळाडू रिषभ पंतला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. वाचा सविस्तर :

५. कल्याणमध्ये एका रिक्षाचालकाने महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेलं असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस रिक्षाचालकाकडे वाहतूक परवाना मागत असताना ही घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नागेश अलवागिरी असं या मुजोर रिक्षाचालकाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 8:28 am

Web Title: top five morning news bulletin odisha andhra pradesh land fall of titli cyclone
Next Stories
1 पेट्रोल, डिझेल महागलं; जाणून घ्या आजचे दर
2 #MeToo : नाना पाटेकरांसह चार जणांवर गुन्हा दाखल
3 आंध्र, ओडिशाला ‘तितली’ची धडक; शाळा-कॉलेज बंद, 3 लाख नागरिकांना हलवले
Just Now!
X