सीबीआय मुख्यालयात छापा, कार्यालयांची झाडाझडती सुरु

केंद्रीय गुन्हाअन्वेषण विभागात (सीबीआय) सध्या उच्चपदस्थांमध्ये संघर्ष सुरु असून रात्री मुख्यालयात छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यालयाची इमारत सील करण्यात आली असून कोणत्याही अधिकारी किंवा बाहेरील व्यक्तीला आतमध्ये जाऊ दिलं जात नाही आहे. अधिकाऱ्यांची एक टीम इमारतीत उपस्थित असून सर्व कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे. वाचा सविस्तर 

पेट्रोल आठ पैशांनी स्वस्त, डिझेलचे दर जैसे थे

संग्रहित छायाचित्र

बुधवारी सलग सातव्या दिवशी पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोल आठ पैशांनी तर दिल्लीत नऊ पैशांनी स्वस्त झाले. तर डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. बुधवारी मुंबईत पेट्रोल ८६. ७३ रुपये दराने मिळत असून डिझेल ७८. ४६ रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल ८१. २५ रुपये आणि डिझेल ७४. ८५ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे. मुंबईत गेल्या सात दिवसांमध्ये पेट्रोल १ रुपये ५७ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलचे  दर ८५ पैशांनी कमी झाले आहेत… वाचा सविस्तर

प्रकाश आंबेडकरांना वंदे मातरम् म्हणावेच लागेल : शिवसेना</strong>

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सध्या प्रकाश आंबेडकरांचा ‘निकाह’ एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्याशी झाला असून त्यामुळे त्यांना राष्ट्रविरोधी झटके येऊ शकतात. पण प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे समाजाचे मालक नाहीत. या देशात वंदे मातरम् म्हणावेच लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे..वाचा सविस्तर

#MeToo: अभिनेत्रीचा दावा, साजिद म्हणाला बिकीनी घालून ये आणि…

लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे साजिद खान अडचणीत आला आहे.

लैंगिक छळाच्या आरोपांमुळे गोत्यात आलेला दिग्दर्शक साजिद खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आणखी एका अभिनेत्रीने साजिद खानवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. ऑडिशनदरम्यान साजिद खानने मला बिकिनी घालून यायला सांगितले आणि मी जेव्हा बिकीनी घालून आले त्यावेळी साजिद सोफ्यावर अश्लील चाळे करत होता, असा आरोप अभिनेत्री प्रियंका बोसने केला आहे…वाचा सविस्तर

भारत-वेस्ट इंडिंज दुसरा सामना आज, विराट कोहलीला मोठ्या विक्रमाची संधी

विराट कोहली आणि रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर भारताने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. पहिल्या सामन्यात दमदार शतकी खेळी करत विराट कोहलीने अनेक विक्रमांना गवसणी घातली होती. विराट कोहलीने सर्वात जलद ३६ शतके ठोकण्याचा पराक्रम केला होता. दुसऱ्या सामन्यातही विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे…वाचा सविस्तर