१. पेट्रोल १५ पैशांनी महाग, डिझेलचे दर जैसे थे!

मुंबईत पेट्रोलचा दर १५ पैशांनी महाग झाला आहे. आता प्रति लिटर पेट्रोल ८९.६९ रुपये आहे. दोन दिवसांपूर्वी हा दर ८९ रुपये ५४ पैसे प्रति लिटर होता. तर डिझेलचे दर दोन दिवसांपूर्वी जे होते तेच आजही आहेत डिझेलचा प्रति लिटर दर हा आजही ७८ रुपये ४२ पैसे इतकाच आहे. दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ८२ रुपये ३२ पैसे झाले आहे तर डिझेल ७३ रुपये८७ पैसे झाले आहे. दिल्लीतही पेट्रोल १० पैशांनी महागले आहे. तर डिझेलचा दर जैसे थे आहे. वाचा सविस्तर :

पेट्रोल पंप

२. आमच्या जनआंदोलनामुळेच मोदी सरकार सत्तेत
केंद्र सरकारमध्ये लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी पाठविलेल्या पत्रात केली आहे. ऑगस्ट २०११ मध्ये देशात झालेल्या जनआंदोलनामुळे जनतेने मोदी सरकारला सत्तेवर येण्याची संधी दिली, त्याच देशवासीयांच्या हिताच्या लोकपाल व लोकायुक्त नियुक्ती संबंधाने चालढकल करणे योग्य नाही, असा टोलाही हजारे यांनी या पत्रात लगावला आहे. वाचा सविस्तर :

 

अण्णा हजारे (संग्रहित छायाचित्र)

३. इराणमधून तेल आयात आता रुपयांमध्ये
अमेरिकेने र्निबध लादलेल्या इराणमधून आयात होणाऱ्या खनिज तेलाची किंमत रुपयामध्ये चुकती करण्याचा व्यवहार भारताने निश्चित केला आहे. यापूर्वी या व्यवहाराकरिता युरो चलनाचा वापर होत होता.भारताच्या यूको बँक व आयडीबीआय बँक या सरकारी बँकांच्या माध्यमातून हा चलन व्यवहार तेल आयातीकरिता होणार आहे. भारतातील सार्वजनिक तेल व वायू विक्री व विपणन कंपन्यांमार्फत इराणमधून आयात होणाऱ्या तेलाचे देयक ६० दिवसांत चुकते करावे लागते. वाचा सविस्तर :

४. पंधरा वर्षे सत्ता हाती असताना काँग्रेस आघाडीने काय केले?
सांगली : समाजमाध्यमात रस्त्यातील खड्डय़ांचे फोटो देऊन प्रसिद्धीचा स्टंट करणाऱ्यांनी १५ वष्रे सत्ता हाती असताना काँग्रेस आघाडीने काय केले, असा सवाल कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. सध्या सत्ताहीन झालेल्यांना काही कामच उरले नसल्याने प्रसिद्धीचा स्टंट सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.वाचा सविस्तर :

sadabhau-khot
सदाभाऊ खोत

 

५. गीरच्या जंगलात ११ दिवसात ११ सिंहांचा मृत्यू
गीरच्या जंगलात मागील ११ दिवसांमध्ये ११ सिंहांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातमधील गीरचे जंगल सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. आता या ठिकाणी ११ सिंहांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गीर जंगलातील पूर्व भागातल्या जंगलात ही घटना घडली आहे. या प्रकरणी गुजरात सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. दलकहनियाजवळील परिसरात या ११ सिंहांचे मृतदेह मिळाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. वाचा सविस्तर :