05 March 2021

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

१. प्रियंका गांधींमुळे युपीत काॅंग्रेसची मतं नी भाजपाच्या जागा वाढणार
प्रियंका गांधी या राजकारणात सक्रिय झाल्या असून त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये अस्तित्व संपुष्टात आलेल्या काँग्रेसला प्रियंका गांधींमुळे फायदा होईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रियंका गांधी या राजकारणात सक्रिय झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पूर्वांचलमध्ये फायदा होऊ शकतो, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. वाचा सविस्तर :

२. नवे नियम लागू झाल्यास WhatsApp भारतातून गाशा गुंडाळण्याची शक्यता
भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. वाचा सविस्तर :

भारतात व्हॉट्सअपचे २० कोटी यूजर्स आहेत. कंपनीसाठी भारत ही जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे.

३.‘मराठा आरक्षण घटनाबाह्य़च!’
सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा राज्यघटनेनुसार कुठलाही अधिकार राज्य सरकारला नसताना तो पायदळी तुडवून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ते रद्द करावे, अशी मागणी या आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वतीने बुधवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. वाचा सविस्तर :

(संग्रहित छायाचित्र)

४. इम्रान आणि कोहलीच्या नेतृत्व गुणांमध्ये साम्य
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार व विद्यमान पंतप्रधान इम्रान खान या दोघांच्या नेतृत्वगुणात मला साम्य दिसते. दोघेही आघाडीवर राहून संघाला प्रेरणा देतात, अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी फिरकीपटू अब्दुल कादिर यांनी कोहलीच्या नेतृत्वगुणाची प्रशंसा केली. वाचा सविस्तर :

अब्दुल कादिर

५.भाऊचा धक्का-मांडवा ‘रॉ पेक्स’ सेवा नवी मुंबईपर्यंत नेण्याची योजना
मुंबई पोर्ट ट्रस्ट’ (बीपीटी)तर्फे भाऊचा धक्का ते मांडवा या जलमार्गावर प्रायोगिक वाहतुकीसाठी ‘रॉ-पेक्स’ या अजस्र जहाजाची खरेदी केली जाणार आहे. यासाठी ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट’ (जेएनपीटी), ‘महाराष्ट्र सागरी महामंडळ’ (एमएमबी) आणि ‘शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ’ (सिडको) प्रत्येकी १० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य करतील. या सेवाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुढे ती नवी मुंबई विमानतळाला जोडण्याचा बीपीटी प्रशासनाचा विचार आहे. वाचा सविस्तर :

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 8:20 am

Web Title: top five morning news bulletin plan to extend ro pax ferry service from bhaucha dhakka mandwa to navi mumbai
Next Stories
1 VIDEO …वाघोबाच्या बछड्यांचं थाटामाटात बारसं!
2 काँग्रेस पदाधिकाऱ्याने केला अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार
3 Video : समाजातील विषमतेची ‘दुरी’ गली बॉयच्या गाण्यात
Just Now!
X