१. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांची चौकशी करावी
सत्ता संपादन करण्याच्या उद्देशातून राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्याद्वारे मतदारांना मोहित करणारे दावे करतात आणि दिशाभूल करणारी आश्वासने देतात. निवडणुकीत मंगळसूत्र, लॅपटॉप किंवा अगदी दारू आणि पैशांचे वाटप होते. वाचा सविस्तर : 

२. कर्करोगापेक्षा उपचार जास्त वेदनादायी – सोनाली बेंद्रे</p>

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली ब्रेंद्रे हाय ग्रेड कॅन्सरवर उपचार घेऊन काही महिन्यांपूर्वीच भारतात परतली आहे. मायदेशी परतल्यानंतर सोनाली विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. काही दिवसांपूर्वी अशाच एका कार्यक्रमांमध्ये सोनालीने हजेरी लावली होती. वाचा सविस्तर : 

३.शिवशंकर मंडळाला विजेतेपद; गणेश जाधव स्पर्धेत सर्वोत्तम
बंडय़ा मारुती क्रीडा मंडळातर्फे आयोजित पुरुषांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशंकर क्रीडा मंडळाने विजेतेपदावर नाव कोरले. शिवशंकरच्याच गणेश जाधवला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. वाचा सविस्तर : 


४.मल्या, मोदीच नव्हे, तर ३६ उद्योगपती देशातून फरारी- ईडी
फौजदारी गुन्हे दाखल असलेले ३६ उद्योगपती ज्याप्रमाणे देशातून पळून गेले, त्याचप्रमाणे ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुशेन मोहन गुप्ता हाही पळून जाण्याची शक्यता असल्याचे सांगून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला. वाचा सविस्तर :

५.हवामान खात्याच्या अंदाजातील महत्त्वाचे परिमाण आणि घटक..
भारतीय हवामान विभागाने सोमवारी मोसमी पावसाबाबतचा पहिला अंदाज जाहीर केला. तो जून ते सप्टेंबर या पावसाच्या काळासाठी असतो. सरकार, उद्योग, सर्वसामान्य लोक यांना पावसाच्या या अंदाजाची नेहमीच प्रतीक्षा असते.  वाचा सविस्तर :