१. किशोरी आणि माझ्यातला फरक कळतो का?, रेणुका शहाणे संतापल्या
हल्ली बरेच कलाकार सोशल मीडियावर बिनधास्तपणे आपली मतं मांडत असतात. अनेकदा त्यांना ट्रोलही केलं जातं. अभिनेत्री रेणुका शहाणे चालू घडामोडी, राजकीय प्रसंग आणि इतर मुद्द्यांवर परखडपणे आपलं मत व्यक्त करत असतात. ट्विटर व फेसबुकच्या माध्यमातून त्या बेधडकपणे आपली मतं मांडतात. त्यासोबतच वेळोवेळी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तरही देतात. वाचा सविस्तर : 

२.वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी कापला ५१ किलोंचा ‘ईव्हीएम’ केक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस शुक्रवारी पार पडला. या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी ५१ किलो ईव्हीएमचा केक कापला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ५१ किलोचा ईव्हीएम केक आणला होता. जो राज ठाकरेंनी कापला. राज ठाकरेंचा ५१ वा वाढदिवस होता त्यानिमित्त हा केक कार्यकर्त्यांनी आणला होता जो कापण्यात आला. वाचा सविस्तर : 

३. देशभरात डॉक्टरांचे आंदोलन तीव्र
कोलकात्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधात देशभरातील डॉक्टरांनी आंदोलन केले. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) या संघटनेने शुक्रवारपासून तीन दिवस निषेध आंदोलन सुरू केले असून सोमवार १७ जूनला आपातकालीन वैद्यकीय सेवा वगळता देशभरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्याचे संघटनेने जाहीर केले. वाचा सविस्तर : 

४.धोनीचा मोठेपणा, चाहत्याला दिलं भारत-पाक सामन्याचे तिकीट
यंदाच्या विश्वचषकातील सर्वात चर्चेची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना. १६ जून रोजी मॅन्चेस्टरमध्ये हे पारंपरिक प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत. या सामन्यासाठी अनेक चाहते इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. तिकिटाचे पैसे नसल्यामुळे अनेक चाहत्याचे हे स्वप्न अधुरेच राहणार आहे. मात्र, पाकिस्तानमधील धोनीचा एक चाहता सामन्याचे तिकीट नसतानाही सहा हजार किलोमिटरचा प्रवास करत इंग्लंडमध्ये पोहचला आहे. वाचा सविस्तर : 


५. नीरेच्या पाण्याआडून भाजपचा राष्ट्रवादीवर निशाणा
पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागासाठी हक्काचे असलेले नीरा देवधर धरणातील अतिरिक्त पाणी नियमबाह्य़ पद्धतीने बारामती व इंदापूरला नेण्यास रोखण्याचा निर्णय अखेर शासनाने घेतला आहे. तसा फतवा जारी झाल्यानंतर लगेचच दुष्काळग्रस्त फलटण, माळशिरस, सांगोला आदी भागास नीरा देवघर धरणातून हक्काचे पाणी झटपट सोडण्यात आले. वाचा सविस्तर :