१. रिझव्‍‌र्ह बँक-सरकारमध्ये समेट!
सरकार आणि बँक नियामकामध्ये संघर्ष उत्पन्न करणारा रिझव्‍‌र्ह बँकेकडील अतिरिक्त रोकडतेचा मुद्दा निकालात काढण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय अखेर मध्यवर्ती बँकेच्या तब्बल नऊ तास चाललेल्या बैठकीत घेण्यात आला. वाचा सविस्तर: 

२. ट्रम्प-इमरान टि्वटरवर भिडले! अमेरिका-पाकिस्तान संबंध आणखी बिघडणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यामध्ये सध्या टि्वटरवर शाब्दीक लढाई रंगली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानची कानउघडणी केली. पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला दडवून ठेवले तसेच पाकिस्तानने अमेरिकेसाठी काही केले नाही असा आरोप ट्रम्प यांनी केला.
वाचा सविस्तर :

३. अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये गोळीबार, हल्लेखोर ठार, तीन जखमी
अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. शिकागो येथील मर्सी रुग्णालयात गोळीबाराची घटना घडली आहे. हल्लेखोराचा मृत्यू झाला असून या गोळीबारात एकूण तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर :

४. सय्यद खुली बॅडमिंटन स्पर्धा : सायना, श्रीकांतवर भारताच्या आव्हानाची धुरा
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने माघार घेतल्यानंतर आता सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांच्यावर मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पध्रेत भारताच्या आव्हानाची धुरा असेल.वाचा सविस्तर :  

सायना नेहवाल

५.व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा: आरोपी ख्रिश्चन मिशेलच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
भारतीय तपास यंत्रणांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी घोटाळयातील मध्यस्थ ख्रिश्चन मिशेलने प्रत्यार्पणाच्या आदेशाविरोधात दाखल केलेली याचिका दुबईच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला ख्रिश्नच मिशेलने दुबईतील सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश कायम ठेवत त्याला झटका दिला. वाचा सविस्तर :