१. सेवाग्राम आश्रमात काँग्रेसलाच ‘चले जाव’?
जनमानसाच्या मनात महात्मा गांधी आणि काँग्रेस या दोन गोष्टी एकरूप आहेत. आजची काँग्रेस गांधीविचारांशी किती एकनिष्ठ आहे, हा वादाचा विषय होऊ शकतो. परंतु तरीही काँग्रेस पक्ष वध्र्याच्या सेवाग्राम आश्रमात पाय ठेवायच्या लायकीचाच नाही, अशा पूर्वग्रहातून कुणी काँग्रेसला दुय्यम वागणूक देणे तरी गांधी विचारांशी कुठे अनुरूप आहे? परंतु असाच प्रकार सध्या सेवाग्राम आश्रमात सुरू आहे. वाचा सविस्तर :

२. उदयनराजेंचा सन्मान करतो परंतु आम्ही त्यांना राजे मानत नाही: जयदीप कवाडे
एक जबाबदार लोकप्रतिनिधी असताना आपल्याला मते देऊन निवडून आणणाऱ्या दलित समाजाला कस्पटासमान समजणारे आणि अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल जाहीरपणे भाष्य करणारे खा. उदयनराजे भोसले आमच्या लेखी राजे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्या लेखी राजे आहेत. राजाने राजासारखे वागावे. आम्ही त्यांचा सन्मान करतो पण उदयनराजेंना आम्ही राजे मानत नाही,’ अशा शब्दात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर थेट साताऱ्यातचं तोफ डागली. वाचा सविस्तर :

(संग्रहित छायाचित्र)

३. आश्रमशाळेतील १४ शिक्षक निलंबित, मुलींचे स्थलांतर
वाळवा तालुक्यातील कुरळपच्या मीनाई आश्रमशाळेतील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आश्रमशाळेतील १४ शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून, आश्रमशाळेतील काही मुलींना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. तसेच गेल्या तीन वर्षांमध्ये आश्रमशाळेस भेट देऊन सर्व काही आलबेल असल्याचे शेरे लिहिण्यात आलेली नोंदवही ताब्यात घेण्यात आली आहे. वाचा सविस्तर :

४. मालदीवच्या नेत्याचे आंतरराष्ट्रीय समुदायाला पाठिंब्याचे आवाहन
मालदीवमध्ये अब्दुल्ला यामीन यांचा निवडणुकीत धक्कादायक पराभव होऊनही ते सत्तेला चिकटून राहण्याचा प्रयत्न करत असल्याच्या वृत्ताच्या पाश्र्वभूमीवर, मालदीवमध्ये सत्तेचे हस्तांतरण शांततेने व्हावे यासाठी देशाचे माजी परराष्ट्रमंत्री आणि आघाडीचे विरोधी पक्ष नेते अहमद नसीम यांनी आंतरराष्ट्रीय पाठिंब्याचे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर :

५. रेल्वेमंत्र्यांनी एमआरव्हीसीला पुन्हा फटकारले
ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गाबाबत सध्या रेल्वेमंत्री व एमआरव्हीसी, मध्य रेल्वेत चांगलीच खडाजंगी सुरू आहे. या प्रकल्पाच्या कामाची मार्च २०१९ची मुदत हुकणार असल्याने आणखी विलंब न होता हे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना पुन्हा एकदा एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) आणि मध्य रेल्वेला रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी केली आहे. वाचा सविस्तर :