१. …तोवर राजकीय गंगा स्वच्छ होणार नाही: शिवसेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभ्रमणात सगळ्यांचेच रेकॉर्ड मोडले आहेत. ते भगवान विष्णूचे अकरावे की बारावे असे अवतार आहेत. त्यामुळे त्यांना जगभरातील भक्तांना दर्शन देण्यासाठी भ्रमण करावे लागत असले तरी या जागतिक वणवणीवर आतापर्यंत १४ हजार कोटी रुपयांचा चुराडा झाला. या परदेश दौऱ्यांमधून भारताला काय मिळाले, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. सौदेबाजी व दलाली करणारी माणसे जोपर्यंत राजकारणात आहेत तोपर्यंत राजकीय गंगा स्वच्छ होणार नाही, असेही शिवसेनेने म्हटले आहे. वाचा सविस्तर :

२. पैसे वाचविण्यासाठी दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ
राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना, केवळ तिजोरीतील पैसे वाचविण्यासाठी राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करीत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. वाचा सविस्तर :

३. ‘मी टू’ प्रकरणी तातडीने सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
‘मी टू’ प्रकरणी याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. एस. के.कौल यांच्या पीठाने सांगितले, की याचिकेची सुनावणी सलग घेतली जाईल पण सुनावणी लगेच मात्र घेतली जाणार नाही. याचिका आम्ही बघितली असून त्यात तातडीने सुनावणी करण्यासारखे काही दिसत नाही. याचिकेत गृहमंत्रालय व राष्ट्रीय महिला आयोग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. वाचा सविस्तर :

४. राज ठाकरे, नाना पाटेकरांनी भाव न दिल्याने तनुश्रीने मला लक्ष्य केले: राखी सावंत
तनुश्री दत्ताला नाना पाटेकर, राज ठाकरे यांनी भाव दिला नाही. यामुळे बेछूट आरोप करत प्रसिद्धी मिळवण्याचा तिचा प्रयत्न फसला. आता प्रसिद्धी मिळवण्यासाठीच तिने माझ्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. आता मी देखील न्यायालयातच तिला सडेतोड प्रत्युत्तर देणार, असे अभिनेत्री राखी सावंतने म्हटले आहे. मी देखील तनुश्रीविरोधात ५० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे तिने म्हटले आहे. वाचा सविस्तर :

संग्रहित छायाचित्र

५. जागतिक टेनिस क्रमवारीत युकीची घसरण
जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल १०० खेळाडूंमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा एकमेव टेनिसपटू युकी भांब्रीच्या स्थानाला सोमवारी धक्का बसला. गुडघ्याच्या दुखापतीतून नुकताच सावरणाऱ्या युकीला गेल्या काही स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे अव्वल १०० खेळाडूंमधील स्थान गमवावे लागले असून त्याची १०७व्या स्थानी घसरण झाली आहे. मात्र रविवारी झालेल्या निंग्बो चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या प्रज्ञेश गुणेश्वरनने कारकीर्दीतील सर्वोच्च अशा १४६व्या स्थानी झेप घेतली आहे. वाचा सविस्तर :

टेनिसपटू युकी भांब्री