१. … म्हणून शरद पवारांना ईडीची नोटीस; मुख्यमंत्र्यांची माहिती
“पात्रता नसताना राज्य सहकारी बँकेनं काही लोकांना कर्ज दिलं. बँकेने वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केले. पैसा चुकीच्या पद्धतीनं वाटला, संपत्ती विकली, कोणालाही कर्ज दिलं अशा काही ठरावांमध्ये शरद पवार यांच्या निर्देशानुसार हे करण्यात आल्याची नोंद केली आहे. याव्यतिरिक्त काही पत्रदेखील आहेत. ज्यामध्ये शरद पवार यांनी काही व्यक्तींना कर्ज देण्याची विनंती केली आहे. त्यामुळं अशा पत्राची आणि कर्जाची चौकशी करण्यात येत आहे. याचा तपास ईडीकडून सुरु आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाचा सविस्तर :   

२. चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ पुसण्याचा घाट
शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवायचे ठरविले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत जनमनांतील अस्मिता तेवत ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा पदोपदी गजर होतो, मात्र महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आला आहे. वाचा सविस्तर :  

३.धोनीच्या निवृत्तीबद्दल सौरव गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला…
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या क्रिकेट प्रशासकिय समितीच्या हाताखाली कारभार चालवल्यानंतर, बीसीसीआयला पहिल्यांदा नवीन अध्यक्ष मिळणार आहे. लोढा समितीने दिलेल्या शिफारसींनुसार बीसीसीआयच्या कारभारात मोठे बदल करण्यात आले आहेत. वाचा सविस्तर :  

४. आलिया भट साकारणार कामाठीपुऱ्याची ‘गंगुबाई’
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. भन्साळी लवकरच कामाठीपुऱ्यामधील विशेष चर्चिल्या गेलेल्या गंगुबाई यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट मुख्य भूमिकेत झळकणार असून तिच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. वाचा सविस्तर :  

आलिया भट

५.PMC बँक प्रकरण : आरोपींच्या ताब्यासाठी ईडीचा विशेष न्यायालयात अर्ज
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या माजी अध्यक्ष वरियम सिंह, एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचे चिरंजीव सारंग यांना आर्थिक गुन्हे विभागाने बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या सुनावणीदरम्यान सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) या तिघांना ताब्यात देण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात सादर केला. वाचा सविस्तर :