News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

१.वेळेवर भत्ता न मिळाल्यामुळे भारतीय महिला संघ अडचणीत
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेळेवर भत्ता न दिल्यामुळे वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला संघावर नामुष्कीची वेळ ओढवली आहे. प्रत्येक दौऱ्यापूर्वी खेळाडूंना काही भत्ते दिले जातात. या भत्त्यांमधून विदेशातील सर्व खर्च करण्यात येतो. परंतु भारतीय खेळाडूंना विंडीजमध्ये जाऊन आठ दिवस झाल्यानंतरही त्यांचे भत्ते मिळालेले नाहीत.  वाचा सविस्तर:

२.‘सत्ता’बाजारात ‘मटका’ लागण्यासाठी भाजपाची ‘आकड्यां’ची जुळवाजुळवसत्ताबाजारात मटका लागावा म्हणून भाजपाची आकड्यांची जुळवाजुळव सुरु आहे. अशावेळी राज्यपालांनी राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे असं शिवसेनेने म्हटलं आहे. नाही म्हणायला एक काळजीवाहू नामक सरकार जरुर आहे. पण या सरकारच्या डोक्यात सत्तास्थापनेसाठीचे आकडे कसे वाढतील याचाच विचार आहे. वाचा सविस्तर : 

३.कॉग्निझंटच्या १३ हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर टांगती तलवार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकी कंपनी कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पने व्यावसायिक पुनर्रचना आणि खर्चात कपातीच्या नियोजनानुसार, येत्या काही महिन्यांमध्ये तब्बल सात हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. शिवाय कंपनी कंटेंट अवलोकन व्यवसायातूही बाहेर पडण्याचा विचार करीत असल्याने आणखी सहा हजार कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याचे गंडांतर येणार आहे. वाचा सविस्तर : 

४. Photo : ‘शोले’ मधील सुरमा भोपाली पाहा आता कसे दिसतात
बॉलिवूडमधील ७० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट म्हणजे ‘शोले’. हा चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज बरीच वर्ष झाली. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. त्यातीलच जय-वीरु, बसंती,गब्बर यांच्याप्रमाणेच ‘सुरमा भोपाली’ हे पात्रही विशेष गाजलं. वाचा सविस्तर : 

जगदीप

५. व्होडाफोन इंडिया व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत ?
दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्होडाफोन आपला भारतातील व्यवसाय बंद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्होडाफोनला सततच्या होणाऱ्या तोट्यामुळे कंपनी हा निर्णय घेऊ शकते. आयएएनएस या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. अद्याप कंपनीकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. वाचा सविस्तर :

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 9:27 am

Web Title: top five morning news bulletin shivsena criticized bjp in saamana editorial ssj 93
Next Stories
1 गुडविनच्या मालकाच्या संपत्तीवर टाच; पोलिसांनी जप्त केल्या गाड्या आणि फ्लॅट
2 व्होडाफोन इंडिया व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत ?
3 पाळत प्रकरणावरून नव्या वादाची चिन्हे
Just Now!
X