१. ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेल्या ‘आभाळमाया’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्का अर्थात शुभांगी जोशी यांचं आज पहाटे निधन झालं. शुभांगी जोशी यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. त्यामुळे आज पहाटे झोपेमध्ये असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. वाचा सविस्तर : 

२. आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर काँग्रेसवर फोडणे हा पंतप्रधान मोदींचा पांचटपणा-शिवसेना

डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण सुरूच आहे. रिझर्व्ह बँक हतबल असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मात्र देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली असे म्हणत अपप्रचार करत आहेत. तुमचे हे नवे अर्थशास्त्र सामान्यांच्या कल्पनेपलिकडचे आहे. आचके देणाऱ्या अर्थव्यवस्थेचे खापर कधी काँग्रेसवर तर कधी रघुराम राजन यांच्यावर फोडणे हा पांचटपणा आहे असे म्हणत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान केले आहे. वाचा सविस्तर :

३.  प्रतीक्षा कालावधी वगळून तीन महिन्यांत घटस्फोटाचा दावा निकाली!
दाम्पत्यामध्ये वाद झाल्यानंतर घटस्फोटाचा दावा कौटुंबिक न्यायालयात दाखल करण्यात येतो. घटस्फोटाचा दावा दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी किमान वर्ष ते दीड वर्षांचा कालावधी लागतो. दरम्यान, एक संगणक अभियंता महिला आणि तिच्या पतीने परस्पर संमतीने दाखल केलेला दावा तीन महिन्यात निकाली काढण्यात आला. घटस्फोटासाठी दाखल केलेल्या दाव्यात सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी (वेटिंग पीरिअड) वगळून न्यायालयाने घटस्फोटाचा दावा मंजूर केला. वाचा सविस्तर : 

 

४.  वादग्रस्त वक्तव्याबाबत भाजपा आमदार राम कदम यांनी व्यक्त केला खेद
भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत खेद व्यक्त करत कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असे म्हटले आहे. विरोधकांनी माझे वक्तव्य अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण केला. आदल्या दिवशी पत्रकार दहीहंडीच्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांनी काहीही आक्षेप घेतला नाही कारण त्यांनी पूर्ण संभाषण ऐकले होते असेही राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  वाचा सविस्तर :  

५. अविनाश पवारचा अन्य आरोपींशी संबंध उघड

मुंबई : हिंदू कट्टरपंथीयांनी बेळगावच्या चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडवला तेव्हा मुंबईच्या घाटकोपर येथून अटक करण्यात आलेला आरोपी अविनाश पवारचा वावर त्याच परिसरात होत. याशिवाय पुण्याच्या सनबर्न या पाश्चिमात्य संगीत महोत्सवात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट आखण्यासाठी आयोजित बैठकीतही पवार उपस्थित होता, अशी माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) मिळाली आहे. वाचा सविस्तर :