१. काश्मीर प्रश्नी मोदींनी मदत मागितल्याचा ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला
अमेरिकेतील व्हाईट हाऊस या ठिकाणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांची भेट झाली. या भेटीदरम्यान आपण काश्मीर प्रश्नात चर्चेसाठी मध्यस्थी करायला तयार आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात मदत मागितली होती असा दावा केला. वाचा सविस्तर :

२.यांनी शोधला चांद्रयान-२ प्रक्षेपकातील बिघाड
भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेचे सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन हे यान अंतराळात झेपावले. चंद्रावर पोहचण्यासाठी या यानाला चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. चांद्रयान-२ मोहिमेत जीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनातील हेलियम टाकीत दाब कमी झाल्याने १५ जुलै रोजी ऐनवेळी उड्डाण रद्द करावे लागले होते. वाचा सविस्तर : 

३. Photo: …अन् बुडता बुडता वाचली प्रियांका
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या मियामीमध्ये पती निक जोनाससोबत तिचा क्वालिटी टाइम घालवत आहे. काही दिवसापूर्वी मियामीमध्ये प्रियांकाच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. ही पार्टी करत असताना प्रियांकाचा तोल जाऊन ती पाण्यात पडल्याचं पाहायला मिळालं. वाचा सविस्तर :

 

४. गौरवास्पद! ‘या’ दोन सुपरवुमन आहेत चांद्रयान-२ मोहिमेच्या शिल्पकार
भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेचे आज यशस्वी प्रक्षेपण झाले. या मोहिमेदरम्यान एक अभिमानास्पद गोष्टही घडली, ती म्हणजे या मोहिमेचे नेतृत्व इस्रोच्या दोन महिला वैज्ञानिकांनी केले. भारताच्या इतिहासात एखाद्या महिलेने अंतराळ मोहिमेसारख्या अतिमहत्वाच्या मोहिमेचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. वाचा सविस्तर : 

५. धोनीच्या निवृत्तीबाबत अझरुद्दीन म्हणतो…
भारतीय संघ ३ ऑगस्टपासून विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी रविवारी संघाची घोषणा करण्यात आली. विश्वचषक स्पर्धेनंतर धोनी निवृत्त होईल अशी अनेकांना अपेक्षा होती, पण त्याने निवृत्ती न घेता काही कालावधीची विश्रांती घेण्याचे ठरवले. त्यामुळे विंडीज दौऱ्यासाठी धोनीचा विचार करण्यात आला नाही. याबाबत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने आपले मत व्यक्त केले आहे. वाचा सविस्तर :