१. “चौकीदार साहेब रोज २० तास काम करत असल्याने देश उद्ध्वस्त होतोय”
बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून निवडणूक लढवणारे विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. भारतीय टपाल खाते तोट्यात चालल्याचे वृत्त समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर कन्हैयाकुमार केलेल्या टिकेमध्ये मोदींना खडेबोल सुनावले आहेत. वाचा सविस्तर : 

२. छे! सलमानसाठी नव्हे, ‘या’ कारणासाठी केलं भारत चित्रपटामध्ये काम – कतरिना कैफ<br />‘क्वांटिको गर्ल’ सलमान खानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र ऐनवेळी प्रियांकाने या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिल्यामुळे तिच्या जागी अभिनेत्री कतरिना कैफची वर्णी लागली. वाचा सविस्तर :

३.बेळगावात ४५ मराठी भाषक उमेदवार रिंगणात
सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी यंदा बेळगाव लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली ४५ मराठी उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या एकंदर चर्चेमुळे भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार चिंतेत आहेत. वाचा सविस्तर : 


४. IPL 2019 : पंतच्या कामगिरीची पुनरावृत्ती?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान न मिळवू शकणाऱ्या ऋषभ पंतच्या कामगिरीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला धूळ चारली होती. गुरुवारी फिरोझशाह कोटला मैदानावर होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात पुनरावृत्ती करण्यासाठी पंत उत्सुक आहे. वाचा सविस्तर : 


५.मतदान यंत्रांच्या स्ट्राँगरूमचे दोन पोलीस निलंबित, जाणून घ्या कारण
राहाता येथे मतदान यंत्रे ठेवलेल्या स्ट्राँगरूमच्या ठिकाणी बंदोबस्तास असलेले दोन पोलीस मद्याच्या नशेत असल्याचे आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी ही कारवाई केली. साहेबराव कोरडे, बाबासाहेब शिरसाठ अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांची नेमणूक नगर पोलीस मुख्यालय येथे होती. वाचा सविस्तर :