22 September 2020

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

टॉप ५

१. अजित पवारांची खोपडी रिकामी, गटारी किड्याला किंमत देत नाही: शिवसेना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यातील वाक् युद्ध संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. अजित पवारांची खोपडी रिकामी असून ते एक गटारी किडा आहे. गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो. भ्रष्टाचाराच्याच प्राणवायूवर जगतो. अशा व्यक्तीस आम्ही किंमत देत नाही, अशा बोचऱ्या शब्दात शिवसेनेने अजित पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत, असा चिमटाही शिवसेनेने काढला आहे. वाचा सविस्तर :

२. ओबामांना टपालाद्वारे स्फोटकं पाठवल्याचं प्रकरण, संशयितास अटक
अमेरिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, २०१६ मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन आणि सीएनएन वृत्तवाहिनीला टपालाद्वारे पाठवण्यात आलेल्या स्फोटकांप्रकरणी तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. सिजर सेयॉक ज्युनिअर या संशयिताला तपास यंत्रणांनी अटक केली असून तो रिपब्लिकन पक्षाचा कट्टर समर्थक असल्याचे समजते. त्याच्या घरातील एका कारमध्ये ट्रम्प यांचे समर्थन करणारे स्टिकर्सही सापडले आहेत. त्याची कसून चौकशी सुरु आहे.
वाचा सविस्तर :

३. विंडीज-ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून धोनीला वगळलं, ‘हिटमॅन’चं कसोटी संघात पुनरागमन
बीसीसीआयने सध्या सुरु असलेल्या विंडीज दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी व आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० व कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेता बीसीसीआयने विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेत विराट कोहली व महेंद्रसिंह धोनी यांना विश्रांती दिली आहे. याजागी रोहित शर्मा विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेत संघाचं नेतृत्व करेल. याचसोबत महेंद्रसिंह धोनीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेसाठीही संघात जागा मिळालेली नाहीये. वाचा सविस्तर :

४. दुष्काळातही प्रशासनाचे मुख्यमंत्र्यांसमोर ‘सारे काही उत्तम’
अवस-पूनवला येणारे पालकमंत्री, राजकीय कार्यक्रम असेल तर येणारे महसूलमंत्री यामुळे जिल्ह्य़ाचे बरेच प्रश्न लोंबकळत पडलेले असताना १९७२चा दुष्काळ परवडला आताचा नको अशी भयावह स्थिती असतानाही प्रशासनाने समोर ठेवलेले उत्तम वातावरणच असल्याचा समज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करण्यात सांगली दौरा यशस्वी झाला. अभूतपूर्व टंचाई स्थिती निर्माण झालेली असतानाही सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींना अद्याप संभाव्य स्थितीचे गांभीर्य कळाले आहे की नाही याची शंका वाटावी अशी स्थिती निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर :

(संग्रहित छायाचित्र)

५. मराठा आरक्षणासाठी २५ नोव्हेंबरपासून ‘ठिय्या’ आंदोलन

राज्य सरकाराने १५ नोव्हेंबपर्यंत मराठा आरक्षण लागू न केल्यास २५ नोव्हेंबरपासून सर्व आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर शांततेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने शुक्रवारी दिला.  वाचा सविस्तर :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 8:12 am

Web Title: top five morning news bulletin uddhav thackeray lashes out on ncp leader ajit pawar over ayodhya visit remark
Next Stories
1 जनतेने टाकलेल्या विश्‍वासावर मोदी खरे उतरले नाहीत: मनमोहन सिंग
2 काश्मीरमध्ये दगडफेकीत जखमी झालेला जवान शहीद
3 मध्यरात्री पुणे पोलिसांचे पथक सुधा भारद्वाज यांच्या निवासस्थानी, सकाळी करणार अटक
Just Now!
X