१. महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीमसैनिकांची चैत्यभूमीवर गर्दी, प्रशासनाकडून विशेष सोय
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कातील चैत्यभूमीवर येऊ लागले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर येऊन आंबेडकरांना अभिवादन करत असतात. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. वाचा सविस्तर :

२. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी होणार? – उद्धव ठाकरे<br />प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. योगी हे मुख्यमंत्री म्हणून प्रचारात तोफा डागत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने दुकान बंद करून प्रचाराची फळी सांभाळली आहे. जातील तेथे घोषणा व नामांतर असेच सुरू आहे. योगी यांची एक सभा मराठवाडय़ात लावा, म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव सहज होईल असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. वाचा सविस्तर :

३.अमेरिकन सैन्यदलाच्या दोन विमानांची हवेत इंधन भरताना टक्कर, सहा नौसैनिक बेपत्ता
जपानच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर अमेरिकन मरीन कॉर्प्सच्या दोन विमानांचा विचित्र अपघात झाला असून सहा नौसैनिक बेपत्ता आहेत. हा अपघात नेमका कसा झाला ते अजून स्पष्ट झालेले नाही. हवेमध्ये इंधन भरण्याचा सराव सुरु असताना कदाचित दोन विमानांची टक्कर झाली असावी असा अंदाज अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर :

४.Ind vs Aus : उस्मान ख्वाजाचा तो झेल पाहून कोहलीही झाला अवाक
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात, पहिल्या सत्राच्या खेळात भारतीय फलंदाजीची अक्षरशः दाणादाण उडाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय त्याच्या फलंदाजांनी पुरता चुकीचा ठरवला. सलामीवीर लोकेश राहुल, मुरली विजय हे ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीकडून भारताला खूप आशा होत्या. गेल्या वर्षभरात विराट कोहली फलंदाजीत चांगल्या फॉर्मात आहे. मात्र आजच्या सामन्यात तो ही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही. वाचा सविस्तर :

५. अडीच टन कांदा विकून नफा नाहीच, उलट साडेतीनशे रुपयांचा भुर्दंड
उत्पादनाचा खर्च आणि विक्रीची किंमत याचे गणित इतके व्यस्त झाले आहे की बाजारात आणलेला कांदा पुन्हा घरी नेण्यासाठी खर्च करावा लागू नये यासाठी व्यापाऱ्यालाच वर पैसे देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काटगावातील शेतकरी विक्रम कोल्हे यांना अडीच टन कांदा विकून अवघे २०८७ रुपये मिळाले, तर नुसता वाहतूक, तोलाई आणि हमाली खर्च २४३० रुपये आल्याने वर व्यापाऱ्यालाच ३४३ रुपये देण्याची पाळी आली. यात कांदा उत्पादनाचा खर्च धरलेला नसल्याने कांदा उत्पादकांना किती फटका बसला आहे, हे स्पष्ट होत आहे. वाचा सविस्तर :