१. साध्वी प्रज्ञा यांनी मुस्लीम समाजाची माफी मागावी, तरच प्रचार करु: भाजपा नेता
मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. साध्वी प्रज्ञा यांनी त्यांच्या मुस्लीमविरोधी विधानांसाठी माफी मागितली तरच मी त्यांचा प्रचार करण्यास तयार आहे, असे सिद्दीकी यांनी सांगितले. वाचा सविस्तर : 


२. IPL 2019 : दिनेश कार्तिकचं शतक हुकलं, कोलकात्याकडून दुसऱ्या सर्वोत्तम खेळीची नोंद
कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर, कोलकाता नाईट रायडर्स संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याचे इतर फलंदाज अपयशी ठरत असताना दिनेश कार्तिकने एका बाजूने संयमी खेळी करत ९७ धावांची खेळी केली. अवघ्या ३ धावांनी कार्तिकचं शतक हुकलं. मात्र या खेळीदरम्यान दिनेश कार्तिकने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून दुसऱ्या सर्वोत्तम खेळीची नोंद केली आहे. वाचा सविस्तर : 


३. महिलांचा सैनिक होण्याचा मार्ग मोकळा
भारतीय लष्कराने गुरुवारपासून महिलांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. लष्करातील ‘मिलिटरी पोलिस’ विभागासाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी महिलांना लष्करात भरती करुन घेण्याची घोषणा केल्यानंतर चार महिन्यांनी ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. वाचा सविस्तर : 

महिला जवान (प्रातिनिधिक फोटो)

४.Kagar Movie Review : राजकारणात रंगलेला त्यांच्या प्रेमाचा ‘कागर’
दिग्दर्शक मकरंद माने यांनी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ या चित्रपटाच्या यशानंतर ‘कागर’ हा नव्या दमाचा आणि नव्या धाटणीचा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले. निवडणुकीची रणधुमाळी,कार्यकर्त्यांनी केलेला प्रचार, निवडणुकीचं राजकारण आणि या साऱ्यामध्ये खुलणारं त्या दोघांचं प्रेम. या साऱ्यावर आधारित हा ‘कागर’. ‘कागर’ म्हणजे प्रेमाला फुटलेली नवी पालवी, छोटासा कोंब. परंतु राजकारणामुळे या प्रेमाचा घोटला गेलेला जीव आणि त्यानंतरही खंबीरपणे एखाद्या पक्षाचं ‘तिने’ केलेलं नेतृत्व या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलं आहे. वाचा सविस्तर :

५.काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांची चित्रपट अभिनेत्री ही प्रतिमा, त्यांचा प्रचाराचा धडाका, त्यांना लाभलेली स्थानिक मनसे नेते आणि कार्यकर्त्यांची साथ यामुळे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील परीक्षेचा पेपर भाजपसाठी सोपा राहिलेला नाही. वाचा सविस्तर :