१.श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट; ४२ जणांचा मृत्यू
जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना, श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. राजधानी कोलंबो शहरांमध्ये एकापाठोपाठ अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये लागोपाठ ८ स्फोट झाले आहेत. वाचा सविस्तर : 

२.‘चुपके-चुपके’च्या रिमेकमध्ये राजकुमार राव साकारणार ‘ही- मॅन’ची भूमिका
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या भूमिका असलेल्या ‘चुपके -चुपके’ या चित्रपटाचा लवकरच रिमेक करण्यात येणार आहे. दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांच्या या चित्रपटामध्ये धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जया भादुरी, शर्मिला टागोर आणि ओम प्रकाश यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. वाचा सविस्तर : 

राजकुमार राव, धर्मेंद्र

३. कोलकाताच्या रसेलसाठी हैदराबादचे चक्रव्यूह
आंद्रे रसेलच्या वादळी खेळीनंतरही कोलकाता नाइट रायडर्सला शुक्रवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुकडून निसटता पराभव पत्करावा लागला होता. रविवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये रसेलला रोखण्यासाठी बलाढय़ सनरायजर्स हैदराबाद कोणते चक्रव्यूह रचते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वाचा सविस्तर : 


४.पाण्यासाठी कोरड्या नदीपात्रातील खड्ड्यांचा आधार
चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना रम्य वाटत असले तरी येथून हाकेच्या अंतरावर असलेले मोझरी गाव भीषण जलसंकटाशी झुंजत आहे. सुमारे ७०० लोकवस्तीच्या या गावातील विहीर आटली, हातपंपही कोरडे पडले. वाचा सविस्तर : 

५. प्रवास नाकारण्याचे कारण लेखी स्वरूपात कळवणे बंधनकारक!
प्रवाशाला कोणत्याही कारणास्तव प्रवास नाकारला गेल्यास तो का नाकारला गेला हे विमान कंपन्यांनी त्याला लेखी स्वरूपात कळवणे बंधनकारक आहे, असा निर्वाळा मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक मंचाने दिला आहे. वाचा सविस्तर :