१. ‘एक्झिट पोल’शी संबंधित सर्व ट्विट हटवा; निवडणूक आयोगाचा ट्विटरला आदेश
भारतीय निवडणूक आयोगाने ‘लोकसभा निवडणूक २०१९’च्या एक्झिट पोलसंदर्भात असलेले सर्व ट्विट हटवण्यात यावेत, असे स्पष्ट आदेश ट्विटर इंडियाला दिले आहेत. ट्विटर इंडियाकडून मात्र अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. वाचा सविस्तर :

२. नरेंद्र मोदी तुम्ही पत्नीची काळजी घेतली नाही देशाची काय घेणार? – ममता बॅनर्जी
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकातामधील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारावरुन राजकीय वातावरण तापलेले असताना तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यक्तीगत पातळीवर टीका केली. नरेंद्र मोदी तुम्ही तुमच्या पत्नीची काळजी घेतली नाही. देशाची काळजी तुम्ही काय घेणार ? अशा शब्दात त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. वाचा सविस्तर : 

३. मुंबईच्या सनी पवारचा न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये डंका; ठरला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार
मुंबईच्या कलिना येथील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सनी पवार या अकरा वर्षीय मुलाने चित्रपट क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. १९व्या न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये त्याने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कार जिंकला आहे. ‘चिप्पा’ या चित्रपटासाठी त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. वाचा सविस्तर : 


४.सनी देओलच्या प्रचारात भाऊ बॉबी देओल का दिसत नाही?
बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहे. सध्या सनी देओल प्रचारसभा आणि प्रचाररॅली यांच्यामध्ये व्यस्त आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या सभांमधून बॉबी देओल दिसेनासा झाला आहे. या मागचं कारणं खुद्द बॉबीने एका मुलाखतीमध्ये दिले आहे. वाचा सविस्तर : 

सनी देओल, बॉबी देओल

५. ICC च्या ट्रोलिंगला सचिन तेंडुलकरचं सडेतोड प्रत्युत्तर
भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जायचा. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर सचिन आपला बालपणीचा सहकारी विनोद कांबळीसह Tendulkar-Middlesex Global Academy च्या माध्यमातून नवीन खेळाडूंना प्रशिक्षण देतो आहे. नुकतच सचिनने नवी मुंबईत नवोदीत खेळाडूंना क्रिकेटचे धडे दिले. वाचा सविस्तर :