१. धार्मिक हिंसाचारांच्या घटनांचा तपास सदोषच!
जातीयता किंवा धार्मिकतेच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचारांच्या घटनांचा तपास सदोष पद्धतीनेच केला जात असल्याने गुन्हेगार मोकाट सुटतात, अशी जळजळीत टीका विधिज्ञ वृंदा ग्रोवर यांनी शुक्रवारी केली. वाचा सविस्तर :

२. गायकवाड यांच्या उमेदवारीचा ‘पोपट तेव्हाच मेला होता’!
लातूरमध्ये भाजपच्या शक्ती केंद्रप्रमुखांचा मेळावा सुरू होता. मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आले होते. तेव्हा ते म्हणाले, ‘यहाँ के लोकप्रिय सांसद’ त्यांच्या या वाक्यावर कार्यकर्ते हसले. त्यांना खासदारांची लोकप्रियता कळली आणि ते म्हणाले, ‘मुझे जो लिख कर दिया है वो मैं पढ रहा हूँ, मुझे क्या पता है’? कार्यकर्त्यांच्या हसण्यातून मिळालेल्या संदेशातच खासदार सुनील गायकवाड यांच्या उमेदवारीचा पोपट मेला होता, अशी चर्चा आता लातूरमध्ये रंगली आहे. वाचा सविस्तर :

३. फुटीरतावादी हुरियत नेते गिलानींना १४.४० लाखांचा दंड
हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद अली शहा गिलानी यांना सक्तवसुली संचालनालयाने सतरा वर्षे जुन्या प्ररकरणात १४.४० लाख रुपये दंड केला आहे. त्यांनी त्यावेळी १० हजार डॉलर्स बेकायदेशीररीत्या बाळगले होते. २० मार्च रोजी परकीय चलन व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्याजवळील ६.९० लाख रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले होते. वाचा सविस्तर :

४. बिहारमध्ये राजद-काँग्रेसचा समझोता
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसमध्ये समझोता झाला आहे. राजद २० तर काँग्रेस नऊ जागा लढविणार आहे. शरद यादव हे राजदच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. वाचा सविस्तर :

(संग्रहित छायाचित्र)

५. झाकीर नाईक याच्या साथीदाराला मुंबईत ‘इडी’कडून अटक
सक्तवसुली संचालनालयाने (इडी) इस्लामी प्रचारक झाकीर नाईक याच्या साथीदाराला मुंबईत अटक करण्यात आली. दरम्यान याप्रकरणी नवीन पुराव्यांच्या आधारे नवे आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.  वाचा सविस्तर :

इस्लामी प्रचारक झाकीर नाईक