१. LIVE: कलम ३७७ च्या वैधतेबाबत सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार

Section 377 Supreme Court Verdict: परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट आज (गुरुवारी) निकाल देणार आहे. वाचा सविस्तर

२. पेट्रोल, डिझेल महागले: जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरांमधील दर

इंधनाच्या दरात वाढ सुरुच असून गुरुवारी मुंबईत पेट्रोल प्रति लिटरमागे १९ पैशांनी तर डिझेल प्रति लिटरमागे २२ पैशांनी महागले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. वाचा सविस्तर 

३. लष्कराचे हवाई प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातून हद्दपार?

आपल्या अखत्यारीतील काही जागा तोफखाना दल देण्यास तयार नसल्याने लष्करी हवाई दलाचे (आर्मी एव्हीएशन) नाशिकमधील प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातून स्थलांतरीत होण्याच्या वाटेवर आहे. वाचा सविस्तर

४. ललिता बाबर उपजिल्हाधिकारी, आवारे पोलीस उपअधीक्षक

जागतिक स्तरावर विविध क्रीडा स्पर्धामध्ये देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना थेट शासकीय सेवेत नियुक्त्या देण्याच्या धोरणानुसार राज्य सरकारच्या विविध विभागांत ३२ खेळाडूंना थेट नेमणुका मिळणार आहेत. वाचा सविस्तर

५. बांधकाम बंदीला तात्पुरता दिलासा

आपल्या राज्यातील बांधकाम बंदीचा आदेश रद्द करावा, अशी विनंती करणाऱ्या महाराष्ट्र आणि उत्तराखंड या राज्यांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतल्या. तसेच १० ऑक्टोबरच्या पुढील सुनावणीपर्यंत या आदेशाला हंगामी स्थगिती दिली. वाचा सविस्तर 

राज्य-देश-विदेश आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांसह दिवसभरातील सर्व बातम्यांचे अपडेट्स तुम्ही लोकसत्ता.कॉमवर पाहू शकणार आहात. क्लिक करा