१. ‘राहुल गांधींचा RSSच्या कार्यक्रमाला जाण्याचा प्रश्नच नाही’

राहुल गांधी किंवा पक्षाच्या इतर नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. आरएसएसकडून पुढील महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण राहुल गांधींना देण्यावरून सुरू असलेल्या चर्चेला खर्गे यांनी उत्तर दिले. आधी निमंत्रण तर येऊद्यात. हे निमंत्रण निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच आहे, असे ते म्हणाले. वाचा सविस्तर-

२. ‘जीएसटी’च्या पेचापायी तीन लाख घरे पडून!

मुंबईसह महानगर प्रादेशिक परिसरात सुमारे तीन लाख घरे तयार असली तरी या घरांच्या खरेदीसाठी कुणी ग्राहक नसल्याचा अहवाल काही सर्वेक्षण संस्थांनी दिला आहे. निवासयोग्य प्रमाणपत्र मिळाल्यावर ग्राहकांना वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी) एक पैसादेखील भरावा लागणार नाही. त्यामुळे सदनिकेच्या किमतीच्या १२ टक्के रकमेची थेट बचत होणार असल्याची मेख त्यामागे असल्याकडे विकासकांनी लक्ष वेधले. वाचा सविस्तर- 

३.नोटाबंदीची खूप मोठी किंमत देशाला मोजावी लागली- पी. चिदंबरम

नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक फटके बसले असून त्यात लोकांचे रोजगार गेले, उद्योग बंद पडले व आर्थिक विकास दर खालावला, अशी टीका माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी केली आहे. नोटाबंदीनंतर पाचशे व हजाराच्या ९९.३ टक्के बाद नोटा परत बँकिंग व्यवस्थेत आल्याच्या रिझर्व बँकेच्या अंतिम निष्कर्षांनंतर त्यांनी सरकारला धारेवर धरले. वाचा सविस्तर- 

४. टोल नाक्यावर व्हीआयपी आणि न्यायाधीशांसाठी स्वतंत्र मार्गिका हवी – हायकोर्ट

राष्ट्रीय महामार्गावरच्या सर्व टोल नाक्यांवर व्हीआयपी आणि विद्यमान न्यायाधीशांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करा असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. आदेशाचे पालन न झाल्यास तो कोर्टाचा अवमान समजला जाईल असेही न्यायालयाने बजावले आहे. वाचा सविस्तर-

५. Asian Games 2018: रिक्षा ओढणाऱ्याच्या मुलीने एशियाडमध्ये मिळवलं सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टॉथ्लॉनमध्ये भारताला पहिलेच सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या स्वप्ना बर्मनने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन हे यश मिळवले आहे. घरची बेताची परिस्थिती असूनही स्वप्नाने जिद्द सोडली नाही. आज सुवर्णपदकाच्या रुपाने तिच्या मेहनतीचे चीज झाले आहे. स्वप्नाचे वडिल रिक्षा ओढण्याचे तर आई चहाच्या मळयामध्ये काम करते. आज आम्ही आनंदी आहोत. मी आणि स्वप्नाच्या वडिलांनी तिच्यासाठी प्रचंड काबाडकष्ट घेतले. आज आमचे स्वप्न साकार झाले. स्वप्नाच्या आईची ही प्रतिक्रियाच सर्वकाही सांगून जाते. वाचा सविस्तर-

राज्य-देश-विदेश आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांसह दिवसभरातील सर्व बातम्यांचे अपडेट्स तुम्ही लोकसत्ता.कॉमवर पाहू शकणार आहात. क्लिक करा