कुपवाडा जिल्ह्यामध्ये सुरक्षादलांसोबत झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला मारण्यात यश आले. क्वारी यासिर असे या दहशतवाद्याचे नाव आहे, असे पोलिसांनी सांगितले. कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब भागातील गारेवाड गावामध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत यासिरला मारण्यात यश आले. लष्कराच्या जवानांनी चकमकीमध्ये पोलिसांना मदत केली.