पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना भारताच्या टॉप नौदल कमांडर्सची कालपासून दिल्लीमध्ये तीन दिवसीय परिषद सुरु झाली आहे. अनेक अंगांनी ही परिषद महत्त्वाची आहे. या परिषदेत कुठल्या मुद्यांवर चर्चा होऊ शकते, रणनितीक दृष्टीने त्याचा काय फायदा आहे ते आपण समजून घेऊया.

दिल्लीत नौदल कमांडर्सची परिषद होत असताना तिथे लडाखमध्ये दोन्ही देशांचं सैन्य आमने-सामने आहे. या सीमावादाच्या पार्श्वभूमीवरच हिंदी महासागर क्षेत्रात भारतीय नौदल अलर्ट मोडवर असून कुठलीही कामगिरी पार पाडण्यासाठी भारतीय युद्धनौका सज्ज आहेत.