News Flash

ही आहेक देशभरातील अव्वल १० पोलीस स्थानके

महाराष्ट्रातील एकही स्थानक नाही

देशभरातील पहिल्या दहा पोलीस स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील एकाही पोलिस स्थानकाला अव्वल दहामध्ये स्थान मिळवता आलेले नाही. २०१८ या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस स्थानकांमध्ये राजस्थानमधील कालू बिकानेर पोलिस स्टेशनने अव्वल स्थान पटकावले आहे.

गृह मंत्रालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या या देशभरातील दहा पोलीस स्थानकांचा गौरव करण्यात आला. स्थानिक पोलिस ठाण्याला इमारतीचे सौंदर्य पाहून नव्हे, तर प्रशासकीय सुसज्ज यंत्रणा, सोयी, सुविधा, नागरीकांना मिळणारी पोलिसी वागणुकीची दखल घेत ही मानंकने निवडण्यात आली आहे.

पोलीस स्टेशनची यादी खालीलप्रमाणे :

कालू (बिकानेर, राजस्थान)
कॅम्पबेल बे (अंदमान-निकोबार)
फरक्का (मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल)
नेत्तापक्कम (पुदुच्चेरी)
गुदेरी (कर्नाटक)
चोपाल (हिमाचल प्रदेश)
लाखेरी – (राजस्थान)
पेरियाकुलम (तामिळनाडू)
मुन्स्यारी (उत्तराखंड)
कुडचरे (गोवा)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 5:56 pm

Web Title: top ten police stations 2018
Next Stories
1 टीव्ही, संगणक आणि टायर यांच्यावरच्या जीएसटीत कपात
2 गोंधळ घातल्यास खासदाराचे दिवसभरासाठी निलंबन
3 राजीव गांधी भारतरत्न वाद: अलका लांबा म्हणतात राजीनामा देणार नाही
Just Now!
X