News Flash

करोनाची लस लवकर मिळेलच याची शाश्वती नाही; अमेरिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञाने दिला इशारा

लसीविषयी दावे करणाऱ्या राजकीय नेत्यांचं न ऐकण्याचं केलं आवाहन

या वर्षातच करोना व्हायरसला रोखणारी लस पूर्णपणे विकसित करु असा आशावाद कंपनीने व्यक्त केला आहे. द हिंदूने हे वृत्त दिले आहे.

करोनाच्या वाढत्या प्रसारानं जगाची झोप उडवली आहे. नोव्हेंबरमध्ये उद्रेक झाल्यानंतर करोनाचे विषाणू जगभरात पोहोचले. त्यामुळे अनेक देशातील परिस्थिती भयावह झाली आहे. करोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्याबरोबरच त्यावर औषधी शौधण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र, करोनावर लवकर लस मिळण्याची शक्यता मावळत चालली आहे. नजिकच्या काळात करोनाची लस मिळेलचं याची शाश्वती नाही, असा इशारा कॅन्सर आणि एचआयव्हीवर संशोधन करणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञाने दिला आहे.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडेच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. करोनाला आवर घालण्यासाठी सध्या त्यावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू असून, अमेरिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञानं याविषयी भूमिका मांडली आहे. विलियम हेसलटाइन, असं या शास्त्रज्ञांचं नाव आहे. विलियम हे कर्करोग, एचआयव्ही/एड्स आणि मानवी जीनोम प्रकल्पांसंदर्भात काम करतात. ‘रॉयटर्स’शी बोलताना विलियम म्हणाले,”करोनाचा मुकाबला करण्यासाठी नजिकच्या काळात लस तयार होण शक्य नाही. त्यामुळे लॉकडाउन उठवताना किंवा शिथिल करताना सर्वच देशांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि स्वयं क्वारंटाइन या पद्धतीचा उपयोग करायला हवा,” असा सल्ला त्यांनी दिला.

“करोनावर लस तयार करण्यात आली, तरी मी त्यावर अवलंबून राहणार नाही. यापूर्वीही करोना विषाणूच्या इतर प्रकारच्या लसी तयार करण्यात आल्या. पण, या लसी जेथून विषाणू शरीरात प्रवेश करतात, त्या नाकातील विशिष्ट त्वचेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचं निष्पन्न झालं आहे,” असं हेसलटाइन यांनी सांगितलं.

“निवडणूक येईपर्यंत आपल्याकडे लस तयार होईल, असं सांगणाऱ्या राजकीय नेत्यांचं ऐकू नका. कदाचित आपल्याला ती लस मिळेलही, पण हा काही जिंकण्याचा प्रकार नाही… कारण आतापर्यंत आपण सार्स आणि मेर्सवर लस शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर पूर्णपणे सुरक्षाउपाय मिळू शकला नाही,” असं ते म्हणाले.

करोनावर नियंत्रण मिळवण्याचा सूचवला मार्ग

करोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विलियम यांनी मार्ग सूचवला आहे. “लसीपेक्षाही इतर मार्गांनी करोनावर नियंत्रण मिळवता येईल. त्यासाठी नागरिकांनी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करायला हवं. तोंडाला मास्क लावायला हवा, हात धुवायला हवेत, सोशल डिस्टन्सिग पाळायला हवं आणि स्वयं क्वारंटाइन आदी गोष्टी करायला हव्यात,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 2:45 pm

Web Title: top us hiv scientist warns coronavirus vaccine not guaranteed bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सहाव्या इयत्तेतील मुलावर तरुणीकडे सेक्स चॅटची मागणी केल्याचा आरोप
2 अम्फान चक्रीवादळ : पश्चिम बंगालला १ हजार कोटींची तात्काळ मदत; पंतप्रधानांची घोषणा
3 Amazon स्विगी, झोमॅटोच्या तोंडचा घास पळवणार?; आता थेट घरपोच जेवणही देणार
Just Now!
X