पुद्दुचेरीतल्या यनाम येथील अय्यनार नगरमध्ये एक निसर्गाचा चमत्कारच पाहण्यास मिळाला. इथे पाऊस आणि वारा यामुळे तुफान तयार झालं. हे तुफान इतकं वेगाचं होतं की चक्क जमिनीवरचं पाणी हे आकाशाकडे झेपावताना पाहण्यास मिळालं. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना कॅमेरात कैद झाली. पुद्दुचेरीमध्ये निसर्गाचा हा चमत्कार पहिल्यांदाच पाहण्यास मिळाला. ऑल इंडिया रेडिओने यासंदर्भातला व्हिडीओ ट्विट केला आहे.

पुद्दुचेरी भागात पाऊसही चांगला कोसळतो आहे. काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणीही साठले होते. अशात निसर्गाचा हा खास चमत्कार पुद्दुचेरीमध्ये पाहण्यास मिळाला.