News Flash

श्रीलंकेत पुरामुळे पाच हजारांहून अधिक लोक बेघर

श्रीलंकेतील ६ जिल्ह्यांमध्ये गुरुवार रात्रीपासून पाऊस कोसळत असून अनेक घरे, भातशेती आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे आलेले आकस्मिक पूर आणि भूस्खलन यामुळे किमान चार जण मरण पावले असून सातजण बेपत्ता आहेत, तर ५ हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

श्रीलंकेतील ६ जिल्ह्यांमध्ये गुरुवार रात्रीपासून पाऊस कोसळत असून अनेक घरे, भातशेती आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोनजण पुरात मरण पावले, तर इतर दोघांनी भूस्खलनात जीव गमावला. पूर आणि भूस्खलनाच्या परिस्थितीत आणखी सात जण बेपत्ता आहेत, अशी माहिती सरकारच्या आपदा व्यवस्थापन केंद्राने दिली. राजधानी कोलंबोच्या पूर्वेला सुमारे ८५ किलोमीटरवर  केगल्ले जिल्ह्यात मातीचा ढिगारा एका घरावर कोसळून   एकाच कुटुंबातील चौघे त्याखाली दबून मरण पावले, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ५ हजारांहून अधिक लोकांना तात्पुरत्या निवारास्थळी हलवण्यात आले असून सुमारे ५०० घरांचे नुकसान झाले.

पॉवर बँकसदृश उपकरणाच्या स्फोटात तरुण ठार

उमरिया : मध्यप्रदेशच्या उमरिया जिल्ह्यात एका तरुणाने रस्त्यावर सापडलेले पॉवर बँकसारखे उपकरण मोबाईलला चार्जिंगसाठी जोडले असता त्याचा स्फोट होऊन त्यात हा तरुण ठार झाला.  ही घटना चाप्रोद खेड्यात शुक्रवारी घडली. ही पॉवर बँक होती, की इतर कुठले इलेक्ट्रॉनिक उपकरण होते हे पडताळून पाहिले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत राम साहिल पाल (वय २८) हा शेतावर जात असताना त्याला हे उपकरण रस्त्यावर पडलेले आढळले. घरी परतल्यानंतर त्याने मोबाईल या उपकरणाला जोडला, मात्र त्याचा स्फोट झाला.

torrential rains Landslide Due to floods Sri Lanka akp 94

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 12:17 am

Web Title: torrential rains landslide due to floods sri lanka akp 94
Next Stories
1 दिल्ली सरकारच्या ‘घर घर राशन’ योजनेला केंद्राकडून स्थगिती
2 मे महिन्यात १.०२ लाख कोटी ‘जीएसटी’ची वसुली!
3 धक्कादायक! मोबाईल चार्जिंगच्या नादात गेला तरुणाचा जीव, कनेक्ट केल्यावर हातातच झाला स्फोट….
Just Now!
X