News Flash

झारखंड – आयडी स्फोटात तीन जवान शहीद, दोन जखमी

सीआरपीएफ आणि झारखंड जग्वारचे युनिट शोध मोहीम राबवत आहे.

संग्रहीत छायाचित्र

नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या ‘आयडी’ च्या स्फोटात झारखंड जग्वार युनिटचे तीन जवान शहीद झाले, तर अन्य दोन जवान जखमी झाले. सीआरपीएफ आणि झारखंड जग्वार यांचे संयुक्त पथक शोध मोहीम राबवित आहे. झारखंडचे डीजीपी नीरज सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे.

आज(गुरूवार) सकाळी ८.४५ मिनिटांनी झारखंडमधील पश्चिम सिंगभूममधील होयाहातू गावच्या वनक्षेत्रात प्रेशर आयडीचा स्फोट झाला. झारखंड जगुआर ऑफ स्टेट पोलिसांचे दोन जवान या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत. याशिवाय सीआरपीएफची १९७ बटालियनचा देखील एक जवान जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.  झारखंड पोलिसांचे म्हणणे आहे की, नक्षलवाद्यांनी आयडी पेरून ठेवले होते. या स्फोटानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 2:05 pm

Web Title: total 3 jawans of jharkhand jaguar unit have lost their lives in an ied blast planted by naxals msr 87
Next Stories
1 ज्येष्ठांना दिलासा! खासगी रूग्णालयांना सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश
2 मेगन मार्कल यांनी कर्मचाऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी होणार चौकशी
3 …तर केरळमध्ये इंधनाचे दर ६० रूपये होतील
Just Now!
X