करोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढतो आहे. भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. कारण भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही ४१८ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या ८९ वर पोहचली आहे. देशातल्या सर्व राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ८९ रुग्ण आहेत. हाच धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रात आजपासून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. तसेच इतर काही राज्यांमध्येही लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने ९ जणांचा बळी गेला आहे. तर २४ जण या आजारातून बरे झाले आहेत.

कोणत्या राज्यात किती करोनाग्रस्त ही पाहा यादी

आंध्र प्रदेश – ५
छत्तीसगढ -१
दिल्ली-२९
गुजरात-१८
हरयाणा-२१
हिमाचलप्रदेश-२
कर्नाटक-२६
केरळ ६७
मध्यप्रदेश-६
महाराष्ट्र-८९
ओदिशा-२
पुद्दुचेरी-१
पंजाब-२१
राजस्थान-२७
तामिळनाडू-६
तेलंगण-२६
चंदीगढ-५
जम्मू आणि काश्मीर-४
लडाख-१३
उत्तर प्रदेश २८
उत्तराखंड-३
पश्चिम बंगाल-७
बिहार-२

अशी आत्तापर्यंत समोर आलेली यादी आहे. करोनाच्या संसर्गातून २४ जण बरे झाले आहेत. सर्वतोपरी काळजी घ्या असं आवाहन राज्य आणि केंद्र सरकारतर्फे करण्यात आलं आहे. तसंच घराबाहेर पडू नका असंही आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रात करोाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.