News Flash

दिलासादायक : देशभरात २४ तासांमध्ये ५३ हजार ९२० जण करोनामुक्त

देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८४ लाख ६२ हजार ८१ वर

(संग्रहित छायाचित्र)

देशात करोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नसला, तरी दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. मागील २४ तासांमध्ये तब्बल ५३ हजार ९२० जणांनी करोनावर मात केली आहे. तर,  ५० हजार ३५७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, ५७७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ८४ लाख ६२ हजार ८१ वर पोहचली आहे.

सणासुदीचे दिवस असल्याने घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने, करोनाबाधितांच्या संख्येतही काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. देशातील एकूण ८४ लाख ६२ हजार ८१ करोनाबाधितांमध्ये ५ लाख १६ हजार ६३२ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७८ लाख १९ हजार ८८७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख २५ हजार ५६२ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

देशभरात ६ नोव्हेंबरपर्यंत ११,६५,४२,३०४ नमून्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील ११ लाख १३ हजार २०९ नमूने काल तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे.

देशात गेल्या पाच आठवडय़ांपासून दरदिवशी करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे दरदिवशी नव्याने लागण होणाऱ्यांहून अधिक आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतील घटही कायम असून त्यांचे प्रमाण देशातील एकूण बाधितांच्या संख्येच्या केवळ ६.१९ टक्के इतके आहे, असे शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 10:06 am

Web Title: total cured cases are 7819887 with 53920 new discharges in the last 24 hrs in india msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 एक वेळ असेल जेव्हा सरकार लोकांसमोर हात जोडून उभं असेल; मेहबुबा मुफ्तींची टीका
2 US Election 2020: …तर व्हाइट हाऊसमधून एस्कॉर्ट केलं जाईल, जो बायडेन यांचा ट्रम्प यांना इशारा
3 बाबा का ढाबा – यू ट्यूबर गौरव वासनविरोधात दिल्ली पोलिसांकडून खटला दाखल
Just Now!
X