23 September 2020

News Flash

टोयोटाने २६२८ इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर परत मागवल्या

या घोषणेतंर्गत १८ जुलै २०१६ ते २२ मार्च २०१८ दरम्यान उत्पादित पेट्रोल इंजिन असलेल्या इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर परत मागवल्या आहेत.

जगप्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनरचे २६२८ वाहने परत मागवल्या आहेत. या वाहनांच्या फ्युल होज राऊटिंगमधील (इंधन संयंत्र) बिघाडाची शंका असल्याने या मॉडेलच्या कार परत मागवल्या आहेत.

जगप्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टोयोटाने इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनरचे २६२८ वाहने परत मागवल्या आहेत. या वाहनांच्या फ्युल होज राऊटिंगमधील (इंधन संयंत्र) बिघाडाची शंका असल्याने या मॉडेलच्या कार परत मागवल्या आहेत. कंपनीकडून याचा तपास केला जाईल आणि जर त्यात बिघाड असेल तर तो बदलून दिला जाईल. यासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येते. वॉरंटी अंतर्गतच याची दुरूस्ती केली जाईल.

या घोषणेतंर्गत १८ जुलै २०१६ ते २२ मार्च २०१८ दरम्यान उत्पादित पेट्रोल इंजिन असलेल्या इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर परत मागवल्या आहेत. या वाहनांच्या फ्युल होज राऊटिंगची तपासणी केली जाईल. जर त्यात बिघाड असेल तर ते बदलण्यात येईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

याप्रकरणी टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने म्हटले की, सुरक्षा आणि ग्राहकांच्या समाधानासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. त्यामुळे भारतातील ही वाहने आम्ही परत मागवत आहोत. यापूर्वी मे महिन्यात कंपनीने एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१८ दरम्यान उत्पादित इनोव्हा क्रिस्टा स्वैच्छिक रूपाने मागवले होते. ही वाहने वायर हार्नेसच्या दुरूस्तीसाठी मागवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 11:37 am

Web Title: toyota recalled 2628 innova crista fortuner cars
Next Stories
1 ‘Forwarded message’ लगेच समजणार, व्हॉट्स अॅपचं नवं फीचर
2 मुंबई पाण्यात बुडाली, पण सरकार काहीच करत नाही; सुप्रीम कोर्टाने फटकारले
3 फेसबुकला पहिला दणका , केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात 4.56 कोटींचा दंड
Just Now!
X