तेलगंणमधील नालगोंडा जिल्ह्यातील वाड्डीपाटला गावाजवळ एका ट्रॅक्टरला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मजूरांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली वाड्डीपाटला गावाजवळ पलटी होऊन कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत ट्रॅक्टरमधील सर्व महिलांचा मृत्यू झाला.

अपघाताच्यावेळी या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ३० शेतमजूर होते. हे सर्व मजूर पादामाती थांडा गावात राहणारे असून ते पुलीचीरला गावात शेत मजुरीच्या कामासाठी जात होते त्यावेळी हा अपघात घडला. पोलीस आणि स्थानिकांनी आतापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढले असून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.