News Flash

धक्कादायक! पॉर्न पाहणाऱ्या भारतीयांचे प्रमाण ९५ टक्क्यांनी वाढले

लॉकडाउनच्या काळात करण्यात आली पाहणी

संग्रहित छायाचित्र

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून घरात बंदिस्त असलेल्या देशातील जनतेचे घराबाहेर पडण्याचा विचार आणखी लांबणीवर पडला आहे. लॉकडाउनमुळे सगळंच बंद असून, लॉकडाउनच्या काळात पॉर्न बघणाऱ्या भारतीयांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. एका पाहणीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ऑनलाईन पॉर्न बघणाऱ्यांसंदर्भात लॉकडाउनच्या काळात भारतात एक पाहणी करण्यात आली. त्या पाहणीत भारतात पॉर्न पाहणारांच्या प्रमाणात ९५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. ८९ टक्के भारतीय मोबाईलवरून थेट साईटवर जाऊन पॉर्न बघतात. तर ३० ते ४० टक्के भारतीय पॉर्न ग्राहक हे व्हिडीओ डाउनलोड करून पाहतात, असं या पाहणीतून समोर आलं आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारनं ३,५०० पॉर्न साईट बंद केल्यानंतरची ही आकडेवारी झोप उडवणारी आहे. केंद्र सरकारनं करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन वेळ लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात आला. या काळात सगळंचं बंद असलं तरी लैगिंक शोषणाच्या घटनांना प्रोत्साहन देणारी धक्कादायकी माहिती समोर आली आहे.

काही वर्षांपूर्वी अशीच एक पाहणी करण्यात आली होती. बंगळुरूतील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या ४०० विद्यार्थ्यांनी या पाहणीत सहभाग नोंदवला होता. त्यातूनही काळजी वाढवणारी माहिती समोर आली होती. पौगंडावस्थेत येण्यापूर्वीच मुलं पॉर्न बघत असल्याचं दिसून आलं होतं. ७० टक्के मुलं वयाची दहा वर्ष पुर्ण होण्यापूर्वीच पॉर्न व्हिडीओ बघण्यात असल्याचं पाहणीत आढळून आलं होतं. त्यामुळे हा मुद्दा चिंता वाढवणारा ठरला. पॉर्न बघण्याचं प्रमाण वाढण्यामागे महत्त्वाचं एक कारण म्हणजे स्वस्त झालेला डेटा. भारतात इंटरनेट डेटा खूप स्वस्तात मिळतो, त्याचबरोबर तारुण्यात येणारी ही पिढी फ्री पॉर्नच्या सापळ्यात अडकली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 5:35 pm

Web Title: traffic on porn sites in india spike upto 95 amid coronavirus covid 19 lockdown bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “जेव्हा जेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या तेव्हा भाजपाचे स्वत:च्या सुटकेस भरल्या”
2 देश करोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचे उत्पादन शुल्क वाढवणे चुकीचे-राहुल गांधी
3 शून्य ते दोन लाख! आता भारतीय कंपन्याच दिवसाला बनवतात इतके PPE किट्स
Just Now!
X