News Flash

लखनौ-वाराणशी मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू

डेहराडून-वाराणशी एक्स्प्रेसचे डबे बचरावन स्थानकानजीक रुळावरून घसरल्याने शुक्रवारी ते तेथून हटवण्यात आल्यानंतर उत्तर रेल्वेच्या लखनौ- वाराणशी मार्गावरील रेल्वे वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

| March 22, 2015 04:19 am

डेहराडून-वाराणशी एक्स्प्रेसचे डबे बचरावन स्थानकानजीक रुळावरून घसरल्याने शुक्रवारी ते तेथून  हटवण्यात आल्यानंतर उत्तर रेल्वेच्या लखनौ- वाराणशी मार्गावरील रेल्वे वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या अपघातानंतर अनेक तास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेन्सच्या साहाय्याने गाडीचे चेपलेले डबे रुळांवरून हटवण्यात आले. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस आणि स्थानिक पोलीस यांनी रेल्वे व स्थानिक प्रशासनाला मदतकार्यात सहकार्य केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळनंतर रेल्वेगाडय़ांची वाहतूक पूर्ववत करण्यावर लक्ष केंद्रित केले.
या अपघातात ३८ जण ठार, तर सुमारे दीडशे जखमी झाले होते. जखमींवर रायबरेली व लखनौच्या इस्पितळांमध्ये उपचार करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 4:19 am

Web Title: traffic resumes on lucknow varanasi section
Next Stories
1 दहशतवाद्यांचे मनोधैर्य खचल्याचा परिणाम – पर्रिकर
2 अमित शहा यांची आज वाराणशीत जाहीर सभा
3 आमदारपुत्र शिपाई पदासाठी रांगेत
Just Now!
X