03 June 2020

News Flash

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात निघालेली श्रमिक रेल्वे पोहोचली ओडिशात; रेल्वे प्रशासन म्हणतं…

गोरखपुरला जाणारी रेल्वे राउरकेलाला पोहोचली होती.

संग्रहित छायाचित्र

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अशा संकटकाळात हाती रोजगार नसल्यानं श्रमिकांनी पायी आपल्या गावची वाट धरली होती. परंतु रेल्वे मंत्रालयानं त्यांना आपापल्या निर्धारित ठिकाणांपर्यंत पोहोचवण्यासाठी श्रमिक रेल्वेची सुरूवात केली आहे. गुरूवारी महाराष्ट्रातील वसई रोड स्थानकावरून उत्तर प्रदेशमधील गोरखपुर या ठिकाणी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे निघाली होती. परंतु ती रेल्वे उत्तर प्रदेशात पोहोचण्याऐवजी ७५० किलोमीटर दूर ओडिशामध्ये पोहोचली.

दरम्यान यामुळे प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला. तसंच काही लोकांनी याबाबत विचारणाही केली. तसंच रेल्वे आपला मार्ग सोडून दुसरीकडे गेली अशा चर्चांनाही उधाण आलं होतं. परंतु त्यावर आता रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ही रेल्वे आपला मार्ग सोडून अन्य ठिकाणी गेली नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

२१ मे रोजी महाराष्ट्रातील वसई रोड या स्थानकावरून सुटलेली वसई गोरखपुर ही ट्रेन कल्याण-भुसावळ-इटारसी-जबलपूर-माणिकपूर या मार्गांवरूनच धावणार होती. परंतु या ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला असून ती बिलासपूर, रसुगुडा, राउरकेला, आसनसोल या मार्गांवरून गोरखपुरला जाईल. विद्यमान मार्गावर कंजेशन असल्यानं या ट्रेनचा मार्ग वळवण्यात आला आहे, असं स्पष्टीकरण पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 1:38 pm

Web Title: train carrying migrants from maharashtra to up ends up in odisha railways claims planned diversion lockdown jud 87
Next Stories
1 “आरबीआयचे गव्हर्नर सरकारला थेटपणे का सांगत नाहीत, की…;” चिदंबरम यांचा हल्लाबोल
2 स्थलांतरित मजुरांचा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता – नीती आयोग
3 भारत-चीन संघर्ष, लष्करप्रमुखांची लेहमध्ये रणनिती संदर्भात फिल्ड कमांडर्सबरोबर प्रदीर्घ चर्चा
Just Now!
X