19 September 2020

News Flash

रेल्वेचे सीट डोक्यावर पडून महिलेचा मृत्यू, साडेचार लाखांची भरपाई

सविता यांच्या वरच्या बाजूला असलेले बर्थ आणि त्यावरील सामान त्यांच्या डोक्यावर पडले. त्यांना उपचारासाठी त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले.

प्रतिनिधिक छायाचित्र

रेल्वे प्रवासादरम्यान डोक्यावर सीट आणि सामान पडून मृत्यू झालेल्या एका ३५ वर्षीय महिलेच्या कुटुंबीयांना भरपाई मिळणार आहे. ग्राहक मंचाने भारतीय रेल्वेला दिलेल्या आदेशात मृत महिलेच्या कुटुंबीयांना ४.४४ लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

२०११ मध्ये गुजरातमधील हिम्मत नगरच्या ग्राहक मंचाने १.९२ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला होता. त्यात राज्य ग्राहक मंचाने वाढ करत भरपाईची रक्कम ४.४४ लाख रुपये केली. मिळालेल्या माहितीनुसार, साबरकांढा येथील दोदाद गावात राहणाऱ्या सविता तारल या २००९ मध्ये आपल्या कुटुंबीयांबरोबर खेडब्रह्मा-तलोड रेल्वेने प्रवास करत होत्या. रेल्वेने अचानक ब्रेक लावल्यामुळे सविता यांच्या वरच्या बाजूला असलेले बर्थ आणि त्यावरील सामान त्यांच्या डोक्यावर पडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी त्वरीत रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्या वाचू शकल्या नाहीत.

सविताचे पती आणि त्यांच्या मुलांनी रेल्वेवर ६.५ लाखांचा दावा दाखल केला. ग्राहक मंचाने २०११ मध्ये ६ टक्के व्याजासह १.९२ लाखांची भरपाई देण्याचा निर्णय सुनावला. परंतु, कुटुंबीय ही रक्कम स्वीकारण्यासाठी तयार नव्हते. हे प्रकरण राज्य ग्राहक मंचात गेले. तेव्हा त्यांनी दर महिना ३ हजार रुपये उत्पन्न गृहीत धरुन ३.८४ लाखांची भरपाई निश्चित केली. त्याचबरोबर सविता यांच्या मुलांचे भावनिक नुकसान झाल्याबद्दल ३० हजार रुपये, अंत्यसंस्कारसाठी १५ हजार आणि मानसिक त्रास तसेच कायदेशीर खर्चासाठी १० हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 11:42 am

Web Title: train passenger dies after berth and luggage falls on woman kin to get 4 44 lakh
Next Stories
1 आम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही; ‘डासू’च्या सीईओंनी काँग्रेसला सुनावले
2 स्यू की यांना रोहिंग्या प्रकरण भोवले, अॅमनेस्टीकडून पुरस्कार परत
3 एके-४७: बंदूकविश्वाची अनभिषिक्त सम्राज्ञी ७१ वर्षांची झाली
Just Now!
X