News Flash

जायचं होतं नवी दिल्ली, ट्रेन पोहोचली जुनी दिल्ली; प्रवासी हैराण

प्रवाशांना नेमकं काय झालंय हेच कळत नव्हतं

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पानीपतहून नवी दिल्लीसाठी निघालेली ट्रेन जेव्हा शेवटच्या स्थानकावर थांबली तेव्हा थोड्या वेळासाठी प्रवाशांना नेमकं काय झालंय हेच कळत नव्हतं. प्रवाशांनी नवी दिल्लीला जाण्यासाठी प्रवास सुरु केला होता, मात्र ट्रेनने त्यांना जुन्या दिल्लीला पोहोचवलं. यानंतर रेल्वेने एका कर्मचा-याचं निलंबन केलं असून, सध्या घटनेची चौकशी सुरु आहे.

रेल्वेने घटनेसंबंधी माहिती देताना सांगितलं आहे की, पानीपतहून येणारी एक्स्प्रेस 64464 सकाळी ७.३० वाजता नवी दिल्ली स्थानकावर पोहोचणं अपेक्षित होतं. पण ट्रॅकमध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे ही ट्रेन सकाळी ७.५० ला जुन्या दिल्ली स्थानकावर पोहोचली.

आपली चूक लक्षात येताच ट्रेनला तात्काळ नवी दिल्ली स्थानकाकडे रवाना करण्यात आल्याचंही रेल्वेने सांगितलं आहे. दरम्यान प्रवाशांना विनाकारण झालेल्या त्रासामुळे रेल्वेने पॅनल संचालकाला निलंबित केलं असून, गैरजबाबदार वागणुकीसाठी जबाबदार कर्मचा-यांची माहिती घेतली जात आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 12:53 pm

Web Title: train reaches old delhi railway station by mistake
Next Stories
1 तुमचं आधार भलतीच व्यक्ती वापरत नाहीये ना? असं तपासा
2 ‘अमित मालवीय म्हणजे भाजपाचा स्टीव्ह स्मिथ’, निलंबित भाजपा खासदाराचा टोला
3 निवडणूक तारीख फुटीचं मालवीयांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण, पण आयोगाला ‘भरोसा’ नाय!
Just Now!
X