03 June 2020

News Flash

जम्मू-काश्मीर: त्रालमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलाची कारवाई

प्रतिकात्मक छायाचित्र

कुपवाडा जिल्ह्यात काल सुरक्षा दलानं पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर आज दुपारी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्राल परिसरात सुरक्षा दलानं ही कारवाई केली. चकमकीत ठार करण्यात आलेले दहशतवादी हे झाकीर मूसाच्या गझवत-उल-हिंद या संघटनेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुलवामातील त्राल परिसरातील गुलाब बाग गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी गावाला घेरलं आणि शोधमोहीम सुरू केली. बुधवारी दुपारी सुरक्षा दलानं शोध मोहीम हाती घेतली. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत झाकीर मूसाच्या संघटनेतील तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. परिसरात आणखी एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती आहे. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरल्याचं सांगण्यात येतं.

चकमकीत मारल्या गेलेल्या तिन्ही दहशतवाद्यांची ओळख पटलेली आहे. इशाक अहमद, झाहीद अहमद आणि अल्ताफ अहमद अशी त्यांची नावे आहेत. इशाक आणि झाहीद हे दोघेही त्रालमधीलच आहेत. तर अल्ताफ हा शोपियानमधील आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, सुरक्षा दलाच्या जवानांनी हाती घेतलेली शोधमोहीम सुरूच आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2017 4:29 pm

Web Title: tral jammu kashmir tral army encounter three terrorist killed zakir musa ghazwat ul hind
Next Stories
1 ‘या’ कारणांमुळे भारतीय हवाई दल चीनवर भारी पडणार
2 जातीयवादी शक्तींविरोधात तुम्ही एकटे लढू शकत नाही, ओवेसींचा लालूंना सल्ला
3 शरद यादवांकडून अहमद पटेलांचे कौतुक; काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा उधाण
Just Now!
X