News Flash

जम्मू काश्मीर, लडाखमध्ये स्थित्यंतर – जयशंकर

विशेष दर्जा समाप्तीची वर्षपूर्ती

संग्रहित छायाचित्र

 

जम्मू काश्मीर, लडाख या भागात स्थित्यंतर सुरू आहे, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त  म्हटले आहे. गेल्या वर्षी पाच ऑगस्टला जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा अनुच्छेद ३७० रद्द करून काढण्यात आला होता.

जयशंकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आता हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश असून तेथे नवीन कायदे लागू केले आहेत. सामाजिक न्याय, सामाजिक सक्षमीकरण व वंचित गटांना लाभ तसेच विकास प्रकल्पांची पायाभरणी ही सगळी स्थित्यंतरे होत आहेत. शिक्षण व रोजगाराच्या संधी वाढल्या असून महिलांच्या हक्कातही प्रगती झाली आहे. जम्मू काश्मीर व लडाखमध्ये स्थित्यंतरे सुरू आहेत.

गेल्या वर्षी ५ ऑगस्टला केंद्राने जम्मू काश्मीरचे विशेष अधिकार काढून घेतले होते व राज्याचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले होते. पाकिस्तानने या प्रश्नावर भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले होते. भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध या निर्णयामुळे आणखी बिघडले असून पाकिस्तानने राजनैतिक संबंध निम्न स्तरावर आणताना भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी केली होती. जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर भारताने तेथे अनेक विकास प्रकल्प सुरू केले असून कल्याणकारी योजना जम्मू काश्मीर व लडाखमध्ये सुरू केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:01 am

Web Title: transfer to jammu and kashmir ladakh s jaishankar abn 97
Next Stories
1 देशातील करोना रुग्ण १९ लाखांवर
2 बैरुतमधील स्फोटात शंभराहून अधिक ठार
3 साता समुद्रापार न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर झळकली प्रभू श्रीराम आणि मंदिराची प्रतिमा
Just Now!
X