यूपीएससीच्या परीक्षेत प्रश्नांचे इंग्रजीतून हिंदीत अनुवाद करण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते त्यासंदर्भातील माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अनुवादित प्रश्नासंदर्भात अडचणी येऊ नये यासाठी ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भूगोल, प्रशासन, इतिहास, व्यापार, दूरसंपर्क या विषयांतील हिंदी आणि अन्य भाषांतील शब्दांचे अर्थही या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहेत. ‘वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक आयोगा’कडून (सीएसटीटी) काही पारिभाषिक शब्दांचे अर्थ मागविण्यात आले असून, हिंदी अनुवादाबाबत आयोगाने नेमलेल्या समितीने मागणी केल्यानंतर ही माहिती ऑनलाइन करण्यात आली. प्रश्नांचे अनुवाद करताना विसंगती आढळल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या.