ब्रिटन सरकारने काल फायझर बायोएनटेकने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीला मान्यता दिली. पुढच्या आठवडयापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना या लशीचे डोस देण्यास सुरुवात होईल. ही लस टोचून घेण्यासाठी भारतीयांना तिथे जायचे आहे. लशीला मान्यता मिळाल्यामुळे आता भारतीय यूकेला जाण्यासाठी ट्रॅव्हल एजंट्सकडे विचारणा करत आहेत.

यूकेमध्ये सुरु होणाऱ्या लशीकरण मोहिमेचा लाभ घेता यावा, यासाठी एका ट्रॅव्हल एजंट भारतीयांसाठी खास तीन नाईट पॅकेजची आखणी करत आहे. ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली आहे.
करोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच फायझरने करोनावर प्रभावी लस तयार करण्यात यश आल्याची घोषणा केली होती. करोना लस टोचून घेण्यासाठी यूकेला जाण्यासंदर्भात बुधवारी काही लोकांनी विचारणा केली असे मुंबई स्थित एका ट्रॅव्हल एजंटने पीटीआयला सांगितले.

आणखी वाचा- ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यात उपलब्ध होणारी लस सुरुवातीला कोणाला मिळणार? जाणून घ्या…

“यूकेमध्ये भारतीयांना करोना प्रतिबंधक लशीचा डोस मिळेल हे आताच सांगणे खूप घाईचे ठरेल. वयोवृद्ध, आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचा पहिला डोस मिळणार आहे” असे या एजंटने त्याच्याकडे यूके टूरसाठी विचारणा करणाऱ्यांना सांगितले.

आणखी वाचा- ब्रिटननंतर आता रशियातही पुढील आठवड्यात होणार करोनाच्या लशीकरणाला सुरुवात

ब्रिटन सरकारनं फायझर व बायोएनटेकच्या लशीला काल परवानगी दिली. फायझरची लस पुढील आठवड्यापासून ब्रिटनमध्ये उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारनं यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारक या सर्व मानकांमध्ये लस योग्य ठरली असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.