News Flash

सलग दुसऱ्या दिवशी दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे धक्के

दिल्ली-एनसीआरला आज सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के बसले

प्रतिकात्मक छायाचित्र

दिल्ली-एनसीआरला आज सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. सोमवारी सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३.६ इतकी या भूंकपाची तीव्रता होती. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील खारखुदा येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे कोणतंही नुकसान झाल्याची अद्याप माहिती नाही.

रविवारीही सायंकाळी ४.३७ वाजताही दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. हरियाणातील झज्जर येथे भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र असल्याने त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. रिश्टर स्केलवर ३.८ इतकी या भूंकपाची तीव्रता होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 9:05 am

Web Title: tremors felt in delhi after earthquake occurred 6 km from meeruts kharkhauda in uttar pradesh
Next Stories
1 महागाईचा मार, पेट्रोल ८८ पार ; आज पुन्हा दर वाढले
2 एचडीएफसी बँकेचे बेपत्ता अधिकारी सिद्धार्थ संघवी यांची हत्या, आरोपीची कबुली
3 Bharat Bandh : पेट्रोल-डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत येईपर्यंत जनआंदोलन-काँग्रेस
Just Now!
X