पुणे :  ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ हे औषध रुग्णांचे प्राणवायूवरील अवलंबित्व कमी करत असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे.  पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या समाधानकारक निकालांनंतर केंद्रीय औषध महानियंत्रकांनी नोव्हेंबर २०२० मध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली.

डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या काळात दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूतील २७ कोविड रुग्णालयांमध्ये या औषधाची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्यात आली. चाचण्यांच्या निकालांमध्ये प्राणवायू पुरवठ्यावर असलेल्या रुग्णांचे त्यावरील अवलंबित्व तिसऱ्या दिवसापासून कमी झाल्याचे दिसून आले. पाण्यात मिसळून प्यायले असता हे औषध विषाणू वाढीला प्रतिबंध करते असा निर्वाळा चाचण्यांच्या निकालांमधून मिळाला असल्याचे केंद्रीय औषध महानियंत्रकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या केवळ रुग्णालयांनाच पुरवठा

डीआरडीओतर्फे  विकसित करण्यात आलेल्या या औषधाचे उत्पादन हैदराबादमधील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीतर्फे  के ले जाणार आहे. सद्याच्या स्थितीत हे औषध के वळ रुग्णालयांना उपलब्ध करून दिले जाईल, कारण त्याचा आपत्कालीन वापर उपचारांदरम्यान प्राणवायू पुरवठ्यावर असलेल्या रुग्णांसाठी के ला जाणार आहे. कालांतराने डॉक्टरांच्या चिठ्ठीवर हे औषध दुकानांतून मिळण्याची शक्यता असल्याची माहिती डीआरडीओकडून देण्यात आली आहे.