गरिबीमुळे झारखंडमध्ये एका अदिवासी महिलेने आपल्या नवजात मुलाला ३००० रुपयांमध्ये विकल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ज्या सरकारी रुग्णालयात संबंधित महिलेने मुलाला जन्म दिला. तिथेच तिने आपल्या पोटच्या मुलाचा सौदा केला आणि या व्यवहारासाठी रुग्णालयातील नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी तिला मदत केली. या प्रकरणी तपास सुरू असून, त्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.
झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. जिल्ह्यातील पोंचापाणी गावातील चितामणी हेब्रम या महिलेला प्रसुतीसाठी मंगळवारी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिने मुलाला जन्म दिला. पण घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे चितामणीला हे मुल घरी नेण्याची इच्छाच नव्हती. त्याचे पालनपोषण कसे करायचे, असा प्रश्न तिच्यापुढे होता. तिने याबद्दल रुग्णालयातील नर्सला सांगितल्यावर तिच्यापुढे मूल विकण्याचा पर्याय ठेवला. त्यांनीच एका दाम्पत्याला शोधून आणून त्यांना हे मूल विकले. ३००० रुपयांमध्ये हा सौदा करण्यात आला. जमशेदपूरमधील एका दाम्पत्याने हे मूल विकत घेतले.
ज्या दिवशी ही घटना घडली. त्यावेळी संबंधित सरकारी रुग्णालयातील अधिकारी तिथे उपस्थित नव्हते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नर्स आणि तिची सहायक यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. खात्यांतर्गत चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती
domestic gas in Panvel
पनवेलमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार
Wide gap between young women and man in electoral rolls in Jalana
जालन्यातील मतदारयाद्यांमध्ये तरुण-तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत