News Flash

धावत्या बसमध्ये आदिवासी तरुणीवर बलात्कार

दिल्लीत धावत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. आता असाच प्रकार ओडिशा येथे घडला असून बसचालकाच्या सहकाऱ्याने एका आदिवासी

| June 19, 2013 07:28 am

दिल्लीत धावत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. आता असाच प्रकार ओडिशा येथे घडला असून बसचालकाच्या सहकाऱ्याने एका आदिवासी तरुणीवर धावत्या वातानुकूलति बसमध्येच बलात्कार केल्याचे मंगळवारी उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या  घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.
कटक-जगतसिंगपूर मार्गावर धावणाऱ्या एका वातानुकूलित बसमधून प्रवास करणाऱ्या २५ वर्षीय आदिवासी मुलीला बसमधील कर्मचारी सुशांता हेंब्रम याने मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास धमकावून बलात्कार केल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्य़ातील रहिवासी असलेली ही तरुणी प्रवास करीत असलेल्या बसमध्ये मोजकेच प्रवासी होते आणि सर्व झोपेत असतानाच आरोपीने आपल्याला धमकावून बलात्कार केल्याची तक्रार पीडित तरुणीने केल्याची माहिती शहर पोलीस उपायुक्त प्रवीण कुमार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. काही प्रवाशांनी तिची सुटका केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर आरोपी आणि पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. पोलिसांचे वैद्यकीय पथकही या प्रकरणी शहर पोलिसांना मदत करीत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर राज्य परिवहन आयुक्त सुरेंद्र कुमार यांनी गुन्हा घडलेल्या बसचा परवाना रद्द केला आहे, तर खाजगी बसमालक संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करीत बसमालकांनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांनी नेमणूक करताना योग्य ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 7:28 am

Web Title: tribal woman raped in moving bus accused arrested 2
Next Stories
1 सीबीआय चौकशीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
2 लष्कर-ए-तोयबाच्या धमकीमुळे गोव्यात सावधानतेचा इशारा
3 ‘सीआरपीएफ’चे जवान करणार प्रतिभा पाटील यांच्या पुण्यातील बंगल्याचे संरक्षण
Just Now!
X