21 September 2019

News Flash

मित्राच्या आईवर केला बलात्काराचा प्रयत्न

एका १८ वर्षीय युवकाने मित्राच्या आईवर बलात्काराचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या टेक्सास शहरातील अर्लिंगटोन भागात ही धक्कादायक घटना घडली.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

एका १८ वर्षीय युवकाने मित्राच्या आईवर बलात्काराचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या टेक्सास शहरातील अर्लिंगटोन भागात ही धक्कादायक घटना घडली. टेक्सास पोलिसांनी या प्रकरणी जॉर्डन कॉरटर या युवकाला अटक केली आहे. आरोपीचे शालेय शिक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. जॉर्डन कॉरटर आणि अन्य युवक रात्री ८.३० च्या सुमारास या महिलेच्या घरी आले. हे सर्व महिलेच्या मुलाचे मित्र आहेत.

मुलाचे मित्र घरी आल्यानंतर या महिलेने घरातील सर्व दारुच्या बाटल्या गोळा केल्या व ती स्वत:च्या रुममध्ये गेली. रात्री अडीजच्या सुमारास जॉर्डन तिच्या बेडरुमचा दरवाजा ठोकत होता त्यामुळे तिला जाग आली. तिने दरवाजा उघडल्यानंतर जॉर्डन जबरदस्तीने तिच्या रुममध्ये घुसला व बेडरुमचा दरवाजा बंद केला.

जॉर्डनने पीडित महिलेला बेडवर ढकलले व तिच्यावर जबरदस्ती सुरु केली. जॉर्डन बलात्काराचा प्रयत्न करत असताना ती प्रतिकार करत होती. तिने जॉर्डनला लाथ मारली व कशीबशी रुममध्ये ठेवलेली पिस्तुल मिळवली. त्या महिलेने नंतर ती पिस्तुल जॉर्डनवर रोखली व त्याला रुमबाहेर जाण्यास भाग पाडले. पीडित महिला दुसऱ्या दिवशी कामावर गेली त्यावेळी ती निराश, हताश झाल्याचे बॉसच्या लक्षात आले. जेव्हा बॉसने तिला विचारले त्यावेळी तिने घडला प्रकार सांगितले तेव्हा बॉसने तिला पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी राजी केले. कॉरटरला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

First Published on June 7, 2018 3:05 pm

Web Title: tried to rape on friends mother teen arrested
टॅग Rape