तृणमूल काँग्रेसचे खासदार व मुखमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिजित बॅनर्जी यांच्या पत्नी रूजिरा यांची कोळसा चोरी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी चौकशी केली. सीबीआयचे पथक येण्यापूर्वीच ममता यांनी अभिषेक यांच्या दक्षिण कोलकाता येथील हरीश मुखर्जी मार्गावरील निवासस्थानी भेट दिली.
सीबीआयचे पथक अभिषेक यांच्या निवासस्थानी दुपार होण्याच्या आधीच दाखल झाले. सुमारे तासभर चौकशी चालली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सीबीआयचे पथक दुपारी सव्वा वाजता तेथून कडक पोलीस बंदोबस्तात परत गेले. कोळसा चोरी प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला याचा तपास करण्यासाठी सीबीआयला रुजिरा बॅनर्जी यांच्या बँक खात्यांची तपासणी करायची होती असे सूत्रांनी सांगितले.
सोमवारी सीबीआयने रुजिरा यांची बहीण मेनका गंभीर हिची चौकशी केली होती. दोन महिला अधिकारी गंभीर यांच्या घरी गेल्या होत्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 24, 2021 12:00 am